Riteish - Raja Shivaji Collection : रितेश भाऊंचा बॉक्स ऑफिसवर जलवा; 'राजा शिवाजी'नं 'सैराट'ला पछाडलं, बनवणार 'हा' जबरदस्त रेकॉर्ड, वाचा कलेक्शन

Raja Shivaji Box Office Collection Day 20 : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. मराठी आवृत्तीने 'सैराट' चित्रपटाला मागे टाकले आहे. २० दिवसात राजा शिवाजीने किती कमावले, जाणून घेऊयात.
Raja Shivaji Box Office Collection Day 20
Riteish - Raja Shivaji CollectionSAAM TV
Published On
Summary

'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला रिलीज झाला.

'राजा शिवाजी' ने 'सैराट' चित्रपटाला मागे टाकले.

नुकतीच 'राजा शिवाजी' ची Success पार्टी झाली.

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाने तीन आठवडे बॉक्स ऑफिसवर यशस्वी कामगिरी केली आहे. चित्रपटाने जगभरात बक्कळ कमाई केली. सर्वत्र रितेश देशमुखचा बोलबाला पाहायला मिळत आहे. 'राजा शिवाजी' चित्रपट १ मे ला रिलीज झाला आहे. 'राजा शिवाजी' चित्रपटाचे दिग्दर्शन रितेश देशमुखने केले असून त्याने चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका देखील साकारली आहे. 'राजा शिवाजी' ने 'सैराट' या मराठी चित्रपटाला मागे टाकून मोठा इतिहास रचला आहे. चित्रपटाची कमाई जाणून घेऊयात.

जगभरात चित्रपटाने आधीच १०० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे आणि आता 'राजा शिवाजी' सर्वाधिक कमाई करणारा मराठी चित्रपट बनण्याच्या विक्रमाच्या दिशेने वेगाने वाटचाल करत आहे. 'राजा शिवाजी' चित्रपट हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये रिलीज झाला आहे. मराठी आवृत्तीत चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटात जिनिलिया देशमुख, अभिषेक बच्चन, सलमान खान , विद्या बालन, फरदीन खान, संजय दत्त , महेश मांजरेकर, सिद्धार्थ जाधव असे अनेक कलाकार झळकले आहेत.

'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस 20

'राजा शिवाजी'ने पहिल्या आठवड्यात ₹५२.६५ कोटी कमावले. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात एकूण कमाईत ₹२४.३० कोटींची भर घातली. Sacnilk च्या रिपोर्टनुसार, रितेश भाऊंच्या 'राजा शिवाजी'ने रिलीजच्या २० व्या दिवशी म्हणजे बुधवारी १.१० कोटी रुपयांची कमाई केली. ज्यामुळे 'राजा शिवाजी'ची २० दिवसांची एकूण कमाई आता ८८.१० कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

इतिहास रचणार

'राजा शिवाजी'ने प्रदर्शनाच्या २० दिवसात बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवली आहे. चित्रपटाची भारतातील नेट कमाई आता ८८ कोटींच्या पुढे गेली आहे. हा चित्रपट आता १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश करण्यापासून काही पावले दूर आहे. आणखी १२ कोटींची कमाई करून 'राजा शिवाजी' बॉक्स ऑफिसवर १०० कोटींचा टप्पा गाठणारा पहिला मराठी चित्रपट ठरेल आणि इतिहास रचेल.

Raja Shivaji Box Office Collection Day 20
Veen Doghantali Hi Tutena :'वीण दोघांतली ही तुटेना' मध्ये धक्कादायक ट्विस्ट; प्रसिद्ध अभिनेत्रीने घेतली एक्झिट, मालिका कोणते वळण घेणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com