प्राजक्ता माळीचा 'फुलवंती' चित्रपट आता टिव्हीवर पाहता येणार आहे.
'फुलवंती' चित्रपट 11 ऑक्टोबर 2024ला थिएटरमध्ये रिलीज झाला.
'फुलवंती' चित्रपटातून प्राजक्ता माळीने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले.
मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali ) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिच्या सौंदर्याचे चाहते दिवाने आहेत. आजवर तिने अनेक मालिका, नाटक, चित्रपट आणि वेब सीरिजमध्ये काम केले आहे. तिच्या अभिनयाचे लाखो चाहते आहेत. तिचा 'फुलवंती' (phullwanti ) चित्रपट खूप गाजला आहे. प्रेक्षकांनी 'फुलवंती'ला खूप प्रेम दिले. बॉक्स ऑफिसवर देखील चित्रपटाने चांगली कमाई केली. त्यानंतर चित्रपट ओटीटीवर आला. ओटीटीवर देखील 'फुलवंती'ने बक्कळ कमाई केली आहे.
'फुलवंती' चित्रपट 11 ऑक्टोबर 2024ला थिएटरमध्ये रिलीज झाला. त्यानंतर 22 नोव्हेंबर 2024ला चित्रपट प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळाला. आता 'फुलवंती'चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियर पाहायला मिळणार आहे. 'फुलवंती' घरबसल्या तुम्ही मोफत पाहू शकणार आहात. याचे अपडेट जाणून घेऊयात.
'फुलवंती' च्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रिमियरची पोस्ट प्राजक्ता माळीने सोशल मीडियावर केली आहे. ज्याला तिने एक खास कॅप्शन दिलं आहे. प्राजक्ता माळीने कॅप्शनमध्ये लिहिलं की, "आपल्या नृत्याने सर्वांना मंत्रमुग्ध करणारी फुलवंती, व्यंकटध्वरी नरसिंह शास्त्रींच्या मनावर करू शकेल का राज्य?" प्राजक्ताचा या पोस्टने चाहते आता 'फुलवंती' पाहण्यासाठी उत्सुक पाहायला मिळत आहे.
'फुलवंती' चित्रपटाला 'फिल्मफेअर मराठी पुरस्कार 2025' या सोहळ्यात 6-7 पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. प्राजक्ताचा 'फुलवंती' चित्रपट रविवार 10 ऑगस्टला दुपारी 12वाजता आणि संध्याकाळी 6 वाजता झी टॉकीजवर पाहायला मिळणार आहे.
'फुलवंती' चित्रपटातून प्राजक्ता माळीने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री स्नेहल तरडेने केले. चित्रपटात प्राजक्ता माळीसोबत मराठी अभिनेता गश्मीर महाजनीने मुख्य भूमिकेत दिसला.
'फुलवंती'ची निर्मिती कोणी केली?
प्राजक्ता माळी
'फुलवंती' कधी रिलीज झाला?
11 ऑक्टोबर 2024
'फुलवंती' ओटीटीवर कधी आला?
22 नोव्हेंबर 2024
'फुलवंती' टिव्हीवर कधी पाहायला मिळणार?
10 ऑगस्ट 2025
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.