Kiran Mane : "लै लै लै भारी वाटलं..."; किरण माने यांनी केलं 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचं कौतुक, नव्या गाडीसोबत फोटो केला शेअर

Kiran Mane Instagram Post : मराठी अभिनेते किरण माने यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याचे कौतुक केले आहे. ते नेमकं काय म्हणाले , जाणून घेऊयात.
Kiran Mane Instagram Post
Kiran Mane SAAM TV
Published On
Summary

किरण माने यांनी महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याचं कौतुक केले.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता रोहित मानेने लग्जरी 'THAR' कार खरेदी केली.

किरण माने यांनी रोहितसोबतचा खास फोटो शेअर करून त्याचे अभिनंदन केले.

मराठी अभिनेते किरण माने (Kiran Mane) कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आजवर त्यांनी मराठी मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे. तसेच ते आपली मते रोखठोकपणे मांडतात. ज्यामुळे सोशल मीडियावर ते कायम चर्चेत असतात. नुकतीच किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या पोस्टमध्ये किरण आपल्या मित्रांचे कौतुक करताना दिसत आहे.

किरण माने यांचा मित्र दुसरा तिसरा कोणी नसून कॉमेडी किंग रोहित माने (Rohit Mane) आहे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून (Maharashtrachi Hasyajatra ) घराघरात पोहोचलेला अभिनेता रोहित माने कायम त्याच्या कॉमेडीमुळे चर्चेत असतो. त्याच्या अभिनयाचा मोठा चाहता वर्ग आहे. नवीन वर्षाच्या सुरुवातीला जानेवारी 2025मध्ये रोहित मानेने आलिशान कार खरेदी केली. रोहितने 'THAR' ही लग्जरी कार खरेदी केली. तेव्हा त्याला कलाकारांनी आणि चाहत्यांनी खूप शुभेच्छा दिल्या आणि त्याचे कौतुक केले.

किरण मानेने रोहित आणि लग्जरी गाडीसोबत एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. जो खूपच खास आहे. या फोटोला त्याने हटके कॅप्शन देण्यात आले आहे. किरण माने यांनी आपल्या स्टाइमध्ये लिहिलं की, "किरण दादा, आपन घेतली तर थार घेनार. नादखुळा गाडी हाय." असं म्हणणाऱ्या आपल्या भावानं, रोहित माने उर्फ सावत्यानं शेवटी स्वप्न साकार केलं! "कुठलीबी गाडी घे पन पासिंग MH 11च पायजे !" ही माझी 'अस्सल सातारी' इच्छाबी त्यानं पुरी केली. मी मुंबईत आलोय हे कळाल्या-कळाल्या गाडी दाखवायला घेऊन आला. लै लै लै भारी वाटलं. लब्यू रोह्या..."

किरण मानेच्या यांच्या या पोस्टवर नेटकरी अभिनंदनाचे मेसेज करत आहेत. रोहित मानेने नवीन गाडीचे फोटो शेअर करताना साताऱ्याची माणसं "THAR" वेडी असे हटके कॅप्शन दिलं होते. रोहितहा साताऱ्याचा आहे. रोहितची लग्जरी कार काळ्या रंगाची आहे. गाडीच्या क्लासी लूक लक्ष वेधून घेतले आहे. अलिकडेच किरण माने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'च्या सेटवर गेले होते. ज्याचे फोटो त्यांनी शेअर केले आहेत.

Kiran Mane Instagram Post
Saiyaara worldwide collection : 'सैयारा' सुसाट! बॉक्स ऑफिसवर जादू कायम, वर्ल्डवाइड कलेक्शन 400 कोटींपार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com