Shreya Maskar
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता निमिश कुलकर्णीचा साखरपुडा थाटामाटात पार पडला आहे.
निमिशने कोमल भास्कर सोबत आपल्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आहे.
निमिश कुलकर्णी 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शो मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचला आहे.
निमिशची बायको कोमल देखील मनोरंजनसृष्टीत सक्रिय आहे.
निमिश आणि कोमलचा साखरपुडा 25 जुलैला झाला आहे.
साखरपुड्याला निमिश आणि कोमलने पारंपरिक लूक केला होता.
निमिशने पांढऱ्या रंगाची डिझायनर शेरवानी आणि कोमलने जांभळ्या रंगाची सुंदर साडी नेसली आहे.
निमिशच्या साखरपुड्याच्या फोटोंवर चाहते आणि कलाकार मित्रमंडळींकडून शुभेच्छांचा, प्रेमाचा वर्षाव होत आहे.