मराठी मनोरंजनसृष्टीत अनेक चित्रपट झाले पण काही चित्रपट कायम आपल्या मनात घर करून राहतात. त्यातलाच एक चित्रपट म्हणजे 'अशी ही बनवा बनवी' (Ashi Hi Banwa Banwi) . 'अशी ही बनवा बनवी' हा चित्रपट आजही प्रेक्षकांना खळखळून हसवतो. या चित्रपटातील डायलॉगने तर सिनेमाला चारचाँद लावले आहेत.
'अशी ही बनवा बनवी' चित्रपटात अशोक सराफ (Ashok Saraf), लक्ष्मीकांत बेर्डे (Laxmikant Berde), सचिन पिळगांवकर (Sachin Pilgaonkar) आणि सिद्धार्थ रे (Siddharth Ray) हे कलाकार पाहायला मिळाले. लक्ष्मीकांत बेर्डे , सचिन पिळगांवकर आणि अशोक सराफ यांच्या कॉमेडीने तर प्रेक्षकांना खूप हसवले आहे.
सचिन पिळगांवकर यांनी नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत सांगितले की, "अशी ही बनवा बनवी चित्रपटाचे डायलॉग मी लिहिलं आहेत. चित्रपटातून मोजून तीन डायलॉग सेटवर बोलले गेले. बाकी डायलॉग स्क्रीप्टमध्ये लिहिले होते. मी आणि वसंत सबनीस यांनी एकत्र मिळून चित्रपटाचे स्क्रिप्ट लिहिलं आहे."धनंजय माने इथेच राहतात का?" हा डायलॉग स्क्रीप्टमध्ये आधीपासून होता. हा डायलॉग शूटिंग करताना सुचला नाही आहे. हे ठरवून केलेलं आहे.
"धनंजय माने इथेच राहतात का?"
"हा माझा बायको पार्वती."
"सारखं सारखं एकाच झाडावर काय?"
"तुम्हाला काही लाज लज्जा आहे का?"
"अजून बारका नाही मिळाला?"
"जाऊबाई,नका हो जाऊ."
"70 रुपये वारले."
'अशी ही बनवाबनवी' चित्रपट 1988ला प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटात सचिन पिळगांवकर, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ हे त्रिकूट पाहायला मिळाले. चित्रपटात सचिन पिळगांवकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी स्त्री पात्र साकारली होती. या चित्रपटातील गाणी आजही धुमाकूळ घालतात. 'अशी ही बनवाबनवी' चित्रपट फुल कॉमेडी आणि मैत्रीवर आधारित आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.