दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर ही प्रेक्षकांची आवडती जोडी आहे. या दोघांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले आहेत. त्यातील 'ये जवानी है दीवानी' (Yeh Jawaani Hai Deewani) हा सर्वात गाजलेला सुपरहिट चित्रपट आहे. आजही या चित्रपटाची गाणी आणि डायलॉग चाहत्यांना पाठांतर आहेत. आज दीपिका पदुकोण (Deepika Padukone ) आणि रणबीर कपूर यांच्या प्रमुख भूमिकेत असलेल्या 'ये जवानी है दीवानी' चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण झाली आहेत.
'ये जवानी है दीवानी' मैत्री, प्रेम, आत्मशोध आणि स्वप्नांच्या मागे धावण्याची ही कथा आजही प्रेक्षकांच्या मनावर तितक्याच प्रभावीपणे अधिराज्य गाजवते. या प्रवासात 'नैना' आणि 'बनी' या पात्रांशी आपली ओळख झाली. 'नैना' ही भूमिका दीपिका पदुकोणने साकारली तर रणबीर कपूरने 'बनी' हे पात्र साकारले. शांत, संवेदनशील, समजूतदार आणि मनाने निरागस असलेली 'नैना' (दीपिका पदुकोण) चाहत्यांचा मनात घर करून गेली. 'ये जवानी है दीवानी' चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण झाली असल्यामुळे 'नैना' चे चित्रपटातील खास संवाद पाहूया.
या ओळींमधून आठवणींची गोडी आणि नात्यांमधील भावनिक गुंतवणूक किती खोल आहे, हे स्पष्ट होतं. एकदा का आपण जुन्या आठवणींमध्ये डोकावू लागलो की सगळ्या भावना परत जाग्या होतात.
अतिशय काव्यात्म शैलीत, भूतकाळाची अचानक जाणीव होण्याचं यात सुरेख वर्णन केले आहे . दीपिकाच्या भावस्पर्शी अभिनयामुळे हा संवाद अजून परिणामकारक वाटतो.
आयुष्याचा एक अत्यंत साधा पण खोल अर्थ सांगणारा हा डायलॉग आहे. नैना आपल्याला शिकवते की प्रत्येक क्षण जगा, परिपूर्णतेच्या मागे धावू नका.
कठीण प्रसंगी दिलासा देणारी, आपल्याला शांत करणारी आणि आधार देणारी ओळ आहे. नैनाच्या समजूतदार स्वभावाची झलक यातून आपल्याला पाहायला मिळते.
12 वर्षांनंतरही हे संवाद आजही तितकेच ताजे आणि हृदयाला स्पर्श करणारे आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.