YJHD Re Release : 'नैना-बनी'कडून चाहत्यांना न्यू इयर गिफ्ट, रणबीर-दीपिकाचा 'ये जवानी है दीवानी' पुन्हा चित्रपटगृहात

Ranbir Kapoor- Deepika Padukone Movie : रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणचा गाजलेला चित्रपट 'ये जवानी है दीवानी' आता पुन्हा एकदा चित्रपटगृहात पाहता येणार आहे. यामुळे चाहते खूप खुश झाले आहेत. चित्रपटाच्या पुनःप्रदर्शितची तारीख जाणून घ्या.
Ranbir Kapoor Deepika Padukone Movie
YJHD Re Release SAAM TV
Published On

अनेकांचा आवडता चित्रपट 'ये जवानी है दीवानी' (Yeh Jawaani Hai Deewani) आता पु्न्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'ये जवानी है दिवानी' हा चित्रपट अयान मुखर्जी दिग्दर्शित आहे. हा सिनेमा खूप सुपरहिट ठरला. आजही या चित्रपटाची हवा पाहायला मिळत आहे. नैना-बनीच्या लव्हस्टोरीने चाहत्यांना भुरळ घातली आहे. या चित्रपटातील डायलॉग आणि गाणी आजही लोकांच्या तोंडावर आहेत.

'ये जवानी है दीवानी' या चित्रपटात रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि दीपिका पदुकोणसोबत (Deepika Padukone) आदित्य रॉय कपूर, कल्की कोचलिन हे कलाकारही झळकले आहेत. 'ये जवानी है दीवानी' हा चित्रपट रोमँटिक कॉमेडी आहे. हा चित्रपट 2013ला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आता तब्बल 11 वर्षानंतर 'ये जवानी है दीवानी' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटी येणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत.

'ये जवानी है दीवानी' पुनःप्रदर्शित तारीख

धर्मा मूव्हीने इंस्टाग्रामवर चित्रपटाच्या पुनःप्रदर्शितचे अपडेट शेअर केले आहेत. चित्रपटाचे पोस्टर शेअर करून त्यांना चाहत्यांना आनंदाचा धक्का दिला आहे. त्यांनी चित्रपट पुनःप्रदर्शित होणार असल्याची घोषणा केली आहे. त्यांनी या पोस्टला हटके कॅप्शन दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, "द गँग इज बँक...आम्हाला तुम्हाला सांगायला खूप आनंद होत आहे की, 'ये जवानी है दीवानी' 3 जानेवारीला पुनःप्रदर्शित होत आहे."

सोशल मिडियावरील या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होताना पाहायला मिळणार आहे. चाहते या बातमीने खूपच खुश झाले आहेत. 'ये जवानी है दीवानी' या चित्रपटात मनालीचे शूटिंग पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील प्रत्येक डायलॉग हिट झाला आहे. तसेच चित्रपटातील रणबीर कपूर आणि दीपिका पदुकोणची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली.

Ranbir Kapoor Deepika Padukone Movie
Suraj Chavan : लवकरच पूर्ण होणार 'बिग बॉस'चा बंगला; मजुरांसोबत स्वतः राबतोय सूरज, पाहा VIDEO

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com