Ranveer - Deepika : दीपिका-रणवीरचा तो फोटो होतोय व्हायरल; काय खरं, काय खोटं?

Ranveer - Deepika Viral Photo : दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगचे फॅमिली फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल फोटोंमध्ये त्यांची मुलगी दुआचा चेहराही स्पष्ट दिसत आहे. चाहते दुआला क्यूट म्हणत आहेत. पण हे सर्व छायाचित्रे बनावट आहेत.
Ranveer deepika and baby dua fake Photo
Ranveer deepika and baby dua fake PhotoGoogle
Published On

Ranveer - Deepika Viral Photo : बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि अभिनेता रणवीर सिंग नेहमी चर्चेत असतात. या वर्षी सप्टेंबरमध्ये या पॉवर कपिलने एका गोंडस मुलीला जन्म दिला. या कपलने आपल्या मुलीचे नाव दुआ पदुकोण सिंग ठेवले आहे. मुलीचे नाव जाहीर करणाऱ्या पोस्टमध्ये या जोडप्याने आपल्या मुलीची झलक दाखवली होती पण तिचा चेहरा अजूनही लपवून ठेवला होता. रणवीर आणि दीपिका अनेकदा आउटिंगला जातात तेव्हा ते आपल्या मुलीचा चेहरा मीडियासमोर येणार नाही याची काळजी घेतात. पण आता सोशल मीडियावर या कपलच्या मुलीचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये दीपिका आणि रणवीर आपल्या मुलीसोबत खेळताना दिसत आहेत.

व्हायरल झालेले फोटो पाहून चाहत्यांनी पुन्हा या कपलचे अभिनंदन करण्यास सुरुवात केली. बेबी दुआच्या गोंडसपणाचे कौतुक करू लागले. चाहते आनंदी होऊ लागले, बाळाची एक झलक पाहण्यासाठी ते हताश आणि अधीर झाले होते मात्र आता तिची झलक दिसल्यामुळे चाहते खुश झाले आहेत. पण हा त्यांचा आनंदी फार काळ टिकू शकला नाही. कारण ही बनावट छायाचित्रे आहेत. दीपिका किंवा रणवीर सिंग दोघांनीही हे फोटो शेअर केलेले नाहीत.

Ranveer deepika and baby dua fake Photo
Salman Khan : सलमान खानच्या चाहत्यांसाठी खूशखबर! सलमानच्या वाढदिवशी प्रदर्शित होणार सिकंदरचा टीझर

रणवीर सिंग-दीपिका पदुकोणचा हा फॅमिली फोटो फेक आहे. हे फोटो AI च्या मदतीने तयार करण्यात आले आहे. या छायाचित्रांमध्ये रणवीर आणि दीपिकाचे चेहरे दुसऱ्या स्त्री-पुरुषाच्या धडाशी जोडलेले आहेत. दीपिका-रणवीरच्या या फोटोंमध्ये काहीही तथ्य नाही. प्रत्येक फोटो बनावट आहे.

Ranveer deepika and baby dua fake Photo
Jilabi Movie : प्रसाद ओकची केस स्वप्नील जोशीकडे, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

अलीकडेच, दीपिका पदुकोण, तिच्या बाळाच्या जन्मानंतर, बेंगळुरूमध्ये दिलजीत दोसांझच्या कॉन्सर्टमध्ये दिसली होती. सैल पांढरा टॉप आणि ब्लू जीन्स परिधान करून ती कॉन्सर्टमध्ये आनंदाने नाचताना आणि मैफिलीचा आनंद लुटताना दिसली. दीपिका दिलजीतसोबत स्टेजवर येऊन 'नमस्कारम बेंगळुरू' म्हणत बेंगळुरू प्रेक्षकांना अभिवादन केले आणि त्यांना कन्नडमध्ये संबोधित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com