Jilabi Movie : प्रसाद ओकची केस स्वप्नील जोशीकडे, जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण?

Jilabi Movie Swapnil Joshi : अभिनेता प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी हे दोन्ही कलाकार आपल्या प्रेक्षकांचे नेहमी विविध माध्यमातून मनोरंजन करत असतात. लवकरच या दोघांचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
swapnil joshi and prasad oak
swapnil joshi and prasad oakSaam Tv
Published On

Jilabi Movie : अभिनेता प्रसाद ओक आणि स्वप्नील जोशी हे दोन्ही कलाकार नेहमीच चर्चेत असतात. सध्या मात्र हे दोन्ही कलाकार एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आले आहेत. प्रसाद ओकच्या केसची धुरा स्वप्नील जोशी सांभाळणार आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेलच नेमकं प्रकरण काय ? आणि कोणती केस? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला बहूचर्चित आगामी मराठी चित्रपट ‘जिलबी’ पहावा लागेल.

‘मला ना गोल गोल फिरवता येत नाही’ मी डायरेक्ट पॉईंट वर येतो. ‘एकदा सुरू झालं ना..की मुळासकट सगळं बाहेर निघेल..! अशा दमदार संवादांसह जिलेबीचा टिझर प्रदर्शित झाला आहे. घटना-प्रसंगांतून निर्माण झालेले गूढ उकलताना उद्योगपती सौरव सुभेदार, डॅशिंग पोलीस अधिकारी विजय करमरकर याची मदत घेतात. यातील पोलीस अधिकारी विजय करमरकर याची भूमिका स्वप्नील साकारणार आहे. स्वप्नील जोशी आणि प्रसाद ओक या दोन आघाडीच्या कलाकारांनी एकत्र सिनेमात दिसावं असं त्यांच्या चाहत्यांना नेहमी वाटत होते. ‘जिलबी’ या चित्रपटाच्या निमित्ताने या दोन अष्टपैलू कलाकारांना एकत्र बघण्याची संधी प्रेक्षकांना लवकरच मिळणार आहे. आनंद पंडित मोशन पिक्चर्स निर्मित आणि नितीन कांबळे दिग्दर्शित ही खुमासदार ‘जिलबी’ १७ जानेवारीला आपल्या मनोरंजनासाठी सज्ज झाली आहे.

swapnil joshi and prasad oak
Vijay Deverakonda : विजय देवरकोंडाने त्याच्या रिलेशनशिपबद्दल केले मोठे विधान ; म्हणाला,'ही बातमी आवडीने...'

आपल्या भूमिकेबद्दल बोलताना प्रसाद ओक म्हणाला, ‘वेगवेगळया भूमिका आणि उत्तम कलाकारांसोबत काम करायला मिळणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं.’ ‘जिलबी’ च्या निमित्ताने एक वेगळी भूमिका करण्याची संधी मिळाली आहे. अत्यंत रुबाबदार, सगळ्या क्षेत्रात दबदबा आणि मानसन्मान असेलला उद्योगपती सौरव सुभेदार ही भूमिका साकारताना मला ही तितकीच मजा आली. गोड आणि गूढ असे दोन्ही स्वाद देणारी ‘जिलबी’ प्रेक्षक नक्कीच एन्जॉय करतील.

swapnil joshi and prasad oak
Salman Khan : सलमान खान करणार अ‍ॅटली सोबत काम; म्हणाला, 'हा चित्रपट आपल्या देशातील सर्वात अभिमानास्पद...'

‘जिलबी’ चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद मच्छिंद्र बुगडे यांचे आहेत. आनंद पंडित आणि रूपा पंडित हे चित्रपटाचे निर्माते आहेत. क्रिएटिव्ह दिग्दर्शन आणि सहनिर्मितीची जबाबदारी राहुल व्ही. दुबे यांनी सांभाळली आहे. छायांकन गणेश उतेकर तर कलादिग्दर्शन कौशल सिंग यांचे आहे. कार्यकारी निर्माते महेश चाबुकस्वार आहेत. आनंद पंडित मोशन पिक्चर्स यांनी अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेन्मेन्ट प्रा.लिमिटेड यांच्या सहयोगाने आणलेला ‘जिलबी’ चित्रपट १७ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com