Salman Khan : सलमान खान करणार अ‍ॅटली सोबत काम; म्हणाला, 'हा चित्रपट आपल्या देशातील सर्वात अभिमानास्पद...'

Salman Khan And Atlee : भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक तयार करण्यासाठी अ‍ॅटली सलमान खान सोबत रजनीकांत किंवा कमल हासन यांना एकत्र आणणार असल्याच्या अफवांवर अ‍ॅटलीने मौन सोडत उत्तर दिले आहे.
salman khan and atlee
salman khan and atleeSam Tv
Published On

Salman Khan And Atlee : किंग खान म्हणजेच शाहरुख खान अभिनित 'जवान' या चित्रपटाच्या ऐतिहासिक यशानंतर, दिग्दर्शक अ‍ॅटली त्यांच्या पुढील मोठ्या प्रकल्पासाठी सज्ज होत आहेत, ज्याचे नाव 'ए६' असे आहे. चित्रपट निर्मात्याने लवकरच या चित्रपटाची धमाकेदार घोषणा करणार असल्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे बॉलीवूडचा भाईजान सलमान खान या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार असल्याची पुष्टी करण्यात अली आहे. अ‍ॅटली भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठ्या चित्रपटांपैकी एक तयार करण्यासाठी रजनीकांत किंवा कमल हसन यांना घेऊन पूर्वनियोजन करत असल्याचेही वृत्त समोर आले आहेत.

सध्या, अ‍ॅटली त्यांच्या पहिल्या निर्मिती 'बेबी जॉन'च्या प्रोमोशनमध्ये व्यग्र आहेत. हा चित्रपट २०२४ च्या ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अभिनेता वरून धवन आणि दाक्षिणात्य अभिनेत्री कीर्ति सुरेश मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाच्या प्रोमोशन निमित्ताने झालेल्या मुलाखतीत अ‍ॅटली याने त्याच्या आगामी चित्रपटाबद्दल अनेक मोठे खुलासे केले.

salman khan and atlee
Ashok Saraf : महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनित नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !

एका मुलाखतीती अ‍ॅटलीला A6 या चित्रपटाबद्दल विचारले असता, अ‍ॅटली म्हणाला, “A6 या चित्रपटासाठी आम्हाला खूप वेळ द्यावा लागणार आहे. आम्ही जवळजवळ पटकथा पूर्ण केली आहे आणि आम्ही तयारीच्या टप्प्यात आहोत. लवकरच, देवाच्या आशीर्वादाने एक धमाकेदार घोषणा होईल."

salman khan and atlee
Video : बिग बॉस फेम जान्हवी किल्लेकर आणि छोट्या पुढारीचा ‘पुष्पा २’मधील ‘या’ गाण्यावरील भन्नाट रील व्हायरल; पहा व्हिडीओ

सलमान खानच्या सहभागाबद्दल, अ‍ॅटलीने पुष्टी दिली. “आपल्या देशातील सर्वात अभिमानास्पद चित्रपट" तयार करण्याचा प्रयत्न सुरु आहे. नक्कीच, मी कलाकारांसह सर्वांना आश्चर्यचकित करणार आहे. तुम्ही काय विचार करत आहात, ते खरे आहे. पण तुम्हाला या चित्रपटाची संपूर्ण कास्ट कळल्यावर खरोखर आश्चर्य वाटेल. हा आपल्या देशातील सर्वात मोठा चित्रपट असणार आहे. या चित्रपटातील कलाकारांचे काम अंतिम टप्प्यात आहे. लवकरच तुमच्या सर्वांसाठी एका मोठ्या चित्रपटाची घोषणा होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com