Vijay Deverakonda : विजय देवरकोंडाने त्याच्या रिलेशनशिपबद्दल केले मोठे विधान ; म्हणाला,'ही बातमी आवडीने...'

Vijay Deverakonda on his dating rumours : दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडा अभिनेत्री रश्मिका मंदान्नाला डेट करत असल्याच्या अफवा सुरु आहेत. या अफवांबद्दल आणि रिलेशनशिप विषयीचे विचार विजयने मांडले आहेत.
Vijay and rashmika
Vijay and rashmikaSaam Tv
Published On

Vijay Deverakonda on his dating rumours : दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडाच्या रिलेशनशिप स्टेटसबद्दल सतत वेगवेगळे तर्क लावले जात आहे. हा अभिनेता श्रीवल्ली म्हणजेच अभिनेत्री रश्मिका मंदान्नाला डेट करत असल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर सुरु आहेत. तसेच नुकतेच ते दोघे एका डेटवर गेल्याचे दिसले, ज्यामुळे चर्चेवला आणखी उधाण आले. पण विजयने त्याच्या नात्याविषयी मोठी बातमी सर्वाना सांगितली आहे. लायगर अभिनेत्याने प्रेम आणि नातेसंबंधांबद्दलचे त्याचे विचार मांडले. जरी त्याने रश्मिकाचे नाव घेतले नाही, तरी तो म्हणाला, “मी तयार असताना याबद्दल बोलेन, जेव्हा मला वाटते की माझ्या अफेर विषयी जगाला जाणून घेण्याची आवश्यकता आहे तेव्हा मी सर्वांसोबत ही बातमी आवडीने शेअर करेन. त्यासाठी एक कारण, एक उद्देश आणि वेळ असणे आवश्यक आहे.

‘प्रेम काही अपेक्षांसह येते’

विजय अलीकडेच 'साहिबा' या संगीत व्हिडीओमध्ये दिसला होता, जिथे त्याने अपूर्ण प्रेमाचा सामना करणाऱ्या तरुणाची भूमिका साकारली होती. त्याला प्रेमाबद्दलच्या त्याच्या कल्पनाबद्दल विचारले असता तो म्हणाला, “मी या विषयाचा तज्ञ नाही, पण हो, जेव्हा मी प्रेम करतो तेव्हा माझ्या काही अपेक्षा असतात. तसेच, मला माहित आहे की ज्या व्यक्तीवर मी प्रेम करतो तिच्याकडून मी काही अपेक्षा ठेवतो. मला माहित नाही की बिनशर्त प्रेम नावाची एखादी गोष्ट अस्तित्वात आहे की नाही. जर ती अस्तित्वात असेल तर ती वेदनांसोबतच अस्तित्वात असते. जर तुम्ही एखाद्यावर बिनशर्त प्रेम केले तर ते करण्यासाठी तुम्हाला काही दुःख आणि वेदना सहन कराव्या लागतात.

Vijay and rashmika
Salman Khan : सलमान खान करणार अ‍ॅटली सोबत काम; म्हणाला, 'हा चित्रपट आपल्या देशातील सर्वात अभिमानास्पद...'

प्रत्येक चित्रपट भारतीय प्रेक्षकांसाठी

अर्जुन रेड्डी फेम अभिनेत्याला आगामी कोणत्या हिंदी चित्रपटात पाहायला मिळणार हे विचारल्यावर तो म्हणाला, “आता कोणीही असे म्हणू शकत नाही की हिंदीमध्ये नवीन चित्रपट येत आहेत किंवा तेलुगूमध्ये नवीन चित्रपट येत आहेत. आज आपण बनवत असलेला प्रत्येक चित्रपट भारतीय प्रेक्षकांसाठी बनवला जात आहे. माझे पुढील चित्रपट तेलुगू दिग्दर्शकांसोबत आहेत आणि तो देशात संपूर्ण भारतभरप्रदर्शित होणार आहे. मी एवढेच म्हणू शकतो की तुम्हाला माझ्याकडून काही मनोरंजक चित्रपट पाहायला मिळतील.

Vijay and rashmika
Ashok Saraf : महाराष्ट्र भूषण अशोक सराफ आणि वंदना गुप्ते अभिनित नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला !

रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा यांनी गीता गोविंदम आणि डिअर कॉम्रेड सारख्या हिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे चाहते आता विजयच्या खुलाशावर रश्मिकाच्या प्रतिक्रियेची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण सोशल मीडियाला सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोडींपैकी ही एक जोडी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com