Shreya Maskar
नुकताच 'झी चित्र गौरव २०२५' पुरस्कार सोहळा पार पडला आहे.
पुरस्कार सोहळ्यात प्राजक्ता माळीच्या 'फुलवंती' चित्रपटाला तब्बल ६ पारितोषिके मिळाली आहेत.
'फुलवंती' सिनेमा ११ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.
'फुलवंती'च्या माध्यमातून प्राजक्ता माळीनी निर्मिती क्षेत्रात पाऊल ठेवले.
'द मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स ऑफ द इयर' हा विशेष पुरस्कार देऊन यावेळी प्राजक्ताचा सन्मान करण्यात आला.
महेश लिमये यांना सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार मिळाला.
वैशाली माढे यांना सर्वोत्कृष्ट गायिका तर उमेश जाधव यांना सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शन या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
मानसी अत्तरदे यांना सर्वेश वेशभूषा आणि महेश बराटे यांना सर्वोत्कृष्ट रंगभूषा म्हणून गौरवण्यात आले.