Shreya Maskar
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्री मीनल शाहने गुपचूप लग्नगाठ बांधली आहे.
मीनलने आपल्या बॉयफ्रेंडसोबत लग्न केले आहे.
मीनलचा शाही विवाह सोहळा गोव्यातील तिच्या बंगल्यात पार पडला आहे.
मीनलने लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
मीनलने फोटोंना 'आय लव्ह यू तथागत… ' असे लिहून चाहत्यांच्या प्रेमासाठी त्यांचे आभार देखील मानले आहेत.
मीनलने लग्नासाठी नारिंगी रंगाची सुंदर साडी नेसली होती.
हातात चुडा, नाकात नथ, कपाळी चंद्रकोर मीनलच्या लूकवर चाहते फिदा आहेत.
सध्या मीनलवर चाहते आणि कलाकारांकडून शुभेच्छांचा आणि प्रेमाचा वर्षाव होत आहे.