Deool Band 2 Collection saam tv
मनोरंजन बातम्या

Deool Band 2 Collection : जय जय स्वामी समर्थ! प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद २' वीकेंडला हाऊसफुल, तिसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

Pravin Tarde - Deool Band 2- Box Office Collection Day 3 : 'देऊळ बंद २' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर हवा पाहायला मिळत आहे. चित्रपटाने तीन दिवसांत बक्कळ कमाई केली आहे. प्रवीण तरडेंच्या चित्रपटाचे कलेक्शन वाचा.

Shreya Maskar

'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला रिलीज झाला.

'देऊळ बंद २' हा शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट आहे.

'देऊळ बंद २' चित्रपटाचे दिग्दर्शन प्रवीण तरडेंनी केले आहे.

शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद २' चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. चित्रपटाने तीन दिवसांत तब्बल १० कोटींचा आकडा पार केला आहे. 'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे (गुरूवारी) रिलीज झाला. चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे.'देऊळ बंद -2' चित्रपटात प्रवीण तरडे, स्नेहल तरडे आणि मोहन जोशी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

'देऊळ बंद २' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ३

दिग्दर्शक प्रवीण तरडेंनी सोशल मीडियावर बॉक्स ऑफिस कलेक्शनची एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टनुसार, 'देऊळ बंद २' चित्रपटाने पहिल्या दिवशी ३.०५ कोटी कमावले तर दुसऱ्या दिवशी ३.११ कोटींचा व्यवसाय केला. वीकेंडला तर चित्रपटाने बक्कळ कमाई केली आहे. कमाईत दुप्पट वाढ झाली आहे. चित्रपटाने तिसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी ( वीकेंडला) तब्बल ५.२१ कोटी रुपयांचा गल्ला जमावला आहे. ज्यामुळे 'देऊळ बंद २' ची तीन दिवसांची एकूण कमाई ११.३७ कोटी रुपये झाली आहे. येणाऱ्या दिवसांत चित्रपट बक्कळ कमाई करणार असल्याचे दिसत आहे.

  • दिवस १ - ३.०५ कोटी रुपये

  • दिवस २ -.११ कोटी रुपये

  • दिवस ३ -५.२१ कोटी रुपये

  • एकूण - ११.३७ कोटी रुपये

'देऊळ बंद २'ची कमाई शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणासाठी देण्यात येणार आहे. 'देऊळ बंद -2'मध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारली आहे. महिला शेतकऱ्याच्या भूमिकेत स्नेहल तरडे दिसली आहे.'देऊळ बंद -2' चित्रपटाचा मुख्य हेतू शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालणे हा असून आत्महत्या करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटत नाहीत तर बदलत्या परिस्थितीनुसार\ काळानुसार शेतीत बदल करण्याची गरज असल्याचा संदेश देते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: बदलापूरचा कोंडेश्वर धबधबा प्रवाहित; पर्यटकांची मोठी गर्दी

Face Care: चाळीशीतही २० वर्षांच्या मुलीसारखा गुलाबी ग्लो पाहिजे? मग फेसवॉश नव्हे, वापरा 'ही' घरगुती सामग्री

काळाचा घाला! रस्ता ओलांडताना भरधाव कारने चिरडले; ७ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू, थरार CCTV मध्ये कैद

Kidney Health: तुमच्या या ६ सवयी किडनीला करतायत निकामी; वेळीच घ्या स्वतःची काळजी

Maharashtra Weather Update: पुण्यासह राज्यभरात धो-धो कोसळणार पाऊस, पुढील ३ दिवस अतिमुसळधार पावसाचा इशारा

SCROLL FOR NEXT