गायकाच्या कारचा भीषण अपघात
गाडीतील तिन्ही गायकांवर रुग्णालयात उपचार सुरू
गायिकेची शस्त्रक्रिया देखील झाली.
मनोरंजन विश्वातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गायकाच्या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघाता दरम्यान कारमध्ये एक गायक आणि दोन गायिका होत्या. गायकाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून ही बातमी चाहत्यांना दिली आहे. नेमकं घडलं काय, जाणून घेऊयात.
सुप्रसिद्ध गायक गणेश शिंदे , गायिका सन्मिता शिंदे आणि प्रतीक्षा हे तिघे 'मोगरा फुलला' हा कार्यक्रम आटपून घरी जात असताना हा भयंकर अपघात घडला. क्षणार्धात एअरबॅग्स ओपन झाल्याने मोठा अनर्थ टळला. जीवाचा धोका टळला. यात गायकाच्या छातीला गंभीर दुखापत झाली आहे. तर सन्मिता आणि गायिका प्रतिक्षा यांच्या पायाला दुखापत झाली आहे. दोन्ही गायिकांचे ऑपरेशन व्यवस्थित पार पडले.
या तिन्ही गायकांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. हे गायक 'मोगरा फुलला', 'ज्ञानियांचा राजा' यांसारख्या संगीतमय कार्यक्रमांसाठी ओळखले जातात. त्यांची व्याख्याने आणि गाणी संत साहित्यावर आधारित असतात. गणेश शिंदे यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून घडलेली सर्व घटना सांगितली आहे.
"कानावरून गेल..
'मोगरा फुलला' कार्यक्रम आटपून घरी परतत असताना आमच्या गाडीला भीषण अपघात झाला. क्षणार्धात एअरबॅग्स ओपन झाल्याने मोठा अनर्थ टळला. मला एअरबॅग्स मुळे छातीला दुखापत झाली असली तरी ती ऑपरेशनशिवाय बरी होण्यासारखी आहे. सन्मिता आणि गायिका प्रतिक्षा यांच्या पायाला दुखापत झाली. मित्रपरिवार, ॲम्ब्युलन्स सेवा आणि माऊली हॉस्पिटल तसेच संचेती हॉस्पिटल येथील डॉक्टरांनी तातडीने मदत केल्यामुळे सर्व उपचार वेळेत सुरू झाले. प्रतिक्षाचे ऑपरेशन व्यवस्थित पार पडले असून सन्मिताचेही ऑपरेशन आता व्यवस्थित पार पडेल. ओटीमध्ये जाताना तिला ज्ञानोबरायांचा फोटो दाखवला मोबाईलमध्ये. म्हटले तू आत्ता बरी होशील आणि माऊली समोर अभंग म्हणशील. इवलेसे रोप लावियेले द्वारी...
या संपूर्ण प्रसंगात अनेक प्रश्न मनात येतात, पण शेवटी जाणवत... अनेक गोष्टी आपल्या हातात नसतात. पुढे अधिक काळजी घ्यायची आणि बाकी सर्व माउलींच्या चरणी स्वाधीन करायचे...
आपल्या सर्व रसिकश्रोत्यांचे, मित्रपरिवाराचे, शुभेच्छा व आशीर्वाद आहेतच. अनेक मित्रांनी मान्यवरांनी मनापासून सहकार्य केले व तातडीने मदत उपलब्ध झाली आभारी आहोत. ज्ञानोबारायांची कृपा आणि आपला आशीर्वाद कायम सोबत राहो.
तुकोबारायांच्या शब्दांत एवढंच -
"कृपाळू सज्जन,तुम्ही संतजन
परी पायावेगळा करू नका..."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.