Manasvi Choudhary
अभिनेत्री संस्कृती बालगुडेने पुन्हा एकदा तिच्या सौंदर्याने चाहत्यांना मोहिनी घातली आहे.
नुकतंच तिने सोशल मिडिया इन्स्टाग्रामवर अकाउंटवर काही फोटो पोस्ट केले आहेत. सिंपल पण एलिगंट लूकमध्ये संस्कृतीने एथनिक लूक केला आहे.
हिरव्या रंगाच्या ड्रेसमध्ये संस्कृतीचं सौंदर्य खुलून आलं आहे. तिने मेकअप आणि दागिने देखील परिधान केले आहे.
संस्कृतीने या सुंदर लूकसाठी मोठे झुमके आणि हेअरकप कानातले घातले आहेत. यामुळे तिचा लूक रॉयल दिसतो आहे.
संस्कृतीचे हे फोटो खुपच सुंदर आहेत. चाहत्यांना देखील तिचे हे फोटो आवडले आहेत. त्यांनी लाईक्स आणि कमेंट्स केल्या आहेत.
संस्कृतीच्या कामाविषयी सांगायच तर, संस्कृती नुकतीच रिलीज झालेल्या 'देऊळ बंद २' या बहुप्रतिक्षित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
या चित्रपटात तिने एक अत्यंत महत्त्वाची आणि प्रभावी भूमिका साकारली असून, तिने थेट चित्रपटाच्या सेटवरील काही खास पडद्यामागचे फोटोही चाहत्यांसोबत शेअर केले आहेत.