Deool Band 2 Collection SAAM TV
मनोरंजन बातम्या

Deool Band 2 Collection : 'देऊळ बंद २'नं रचला इतिहास; रितेश देशमुखच्या चित्रपटालाही पछाडलं, प्रवीण तरडेंच्या सिनेमाची कमाई किती?

Pravin Tarde - Deool Band 2- Box Office Collection Day 21 : प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2' चित्रपटाने रितेश देशमुखच्या चित्रपटाला मागे टाकत मोठा इतिहास रचला आहे. 'देऊळ बंद 2' ने बक्कळ कमाई केली आहे.

Shreya Maskar

'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला रिलीज

'देऊळ बंद २' ने रितेश देशमुखच्या चित्रपटाला टाकले मागे

'देऊळ बंद २'ने मराठी चित्रपटसृष्टीत रचला इतिहास

'देऊळ बंद २' च्या घवघवीत यशानंतर प्रवीण तरडे 'मुळशी पॅटर्न २' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला रिलीज झाला. 'देऊळ बंद २' ची टीम अनेक चित्रपटगृहात जाऊन प्रेक्षकांना सरप्राइज देत आहे. स्वतः प्रवीण तरडे याचे खास व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत आहेत. या चित्रपटातून स्वामी भक्ती आणि शेतकरी जीवन यांचा सुरेख संगम पाहायला मिळत आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि अभिनेत्री स्नेहल तरडे यांच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. चित्रपटाने मोठा इतिहास रचला आहे.

'देऊळ बंद २' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस २१

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'देऊळ बंद २' चित्रपटाने २१ व्या दिवशी म्हणजे चौथ्या बुधवारी १,१३७ शोमधून ०.९० लाख रुपयांची नेट कमाई केली आहे. यामुळे भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन ७३.९४ कोटी रुपये आणि एकूण नेट कमाई ६२.९० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. चित्रपट लवकरच १०० कोटींचा टप्पा गाठेल.

  • दिवस १ - ३.०५ कोटी रुपये

  • दिवस २ -३.११ कोटी रुपये

  • दिवस ३ -५.२१ कोटी रुपये

  • दिवस ४ - ६. १० कोटी रुपये

  • दिवस ५ - ३. ७० कोटी रुपये

  • दिवस ६ - ३.३५ कोटी रुपये

  • दिवस ७ - ३.६० कोटी रुपये

  • दिवस ८ - ४.५५ कोटी रुपये

  • दिवस ९ - ३.१० कोटी रुपये

  • दिवस १० - ५ कोटी रुपये

  • दिवस ११ - ५.७५ कोटी रुपये

  • दिवस १२ - २.६० कोटी रुपये

  • दिवस १३ - २.३५ कोटी रुपये

  • दिवस १४ -१.८० कोटी रुपये

  • दिवस १५ -१.८० कोटी रुपये

  • दिवस १६ -१.४० कोटी रुपये

  • दिवस १७ - २.६० कोटी रुपये

  • दिवस १८ - ३.१५ कोटी रुपये

  • दिवस १९ - १. १५ कोटी रुपये

  • दिवस २० - १.१० कोटी रुपये

  • दिवस २१ - ९० लाख रुपये

  • एकूण - ६२.९० कोटी रुपये

'देऊळ बंद २' ने रचला इतिहास

'देऊळ बंद २' चित्रपटाने रेकॉर्ड ब्रेक कामगिरी केली आहे. प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाने २०२२ साली रिलीज झालेल्या रितेश देशमुखच्या 'वेड' या चित्रपटाला मागे टाकले आहे. 'देऊळ बंद २' मराठीत सर्वाधिक कमाई करणारा चौथा चित्रपट ठरला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, टॉप ५ मराठी चित्रपटांची यादी पाहा-

  • 'राजा शिवाजी' १०५.६४ कोटी रुपये

  • 'सैराट' ९० कोटी रुपये

  • 'बाई पण भारी देवा' ७६.२८ कोटी रुपये

  • 'देऊळ बंद २' ६२ कोटी रुपये

  • 'वेड' ६१.२ कोटी रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune : पुण्यात प्रेमाचा भयंकर शेवट! कॉम्प्युटर इंजिनीअर तरुणीने संपवलं आयुष्य; बॉयफ्रेंडला बेड्या

Pm Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबर की नोव्हेंबर? शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट

भाजपच्या बैठकीत अचानक तुकाराम मुंढेंच्या एफडीएची रेड, राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ

Amit Thackeray: शिवरायांच्या बाजूला PM मोदींचा फोटो कशाला?, संतप्त झालेल्या अमित ठाकरेंनी काढायला लावला फोटो; पाहा VIDEO

Heart attack symptoms: हार्ट अटॅक येण्याच्या 15 दिवस अगोदर पायांमध्ये दिसतात 'हे' 3 मोठे बदल, वेळीच लक्ष द्या

SCROLL FOR NEXT