Deool Band 2 Collection saam tv
मनोरंजन बातम्या

Deool Band 2 Collection : स्वामी भक्तांनी थिएटर हाऊसफुल्ल; 'देऊळ बंद २'ची विक्रमी घोडदौड कायम, प्रवीण तरडेंच्या चित्रपटाची छप्परफाड कमाई

Pravin Tarde - Deool Band 2- Box Office Collection Day 16 : तिसऱ्या आठवड्यातही प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद 2' चित्रपट हाऊसफुल पाहायला मिळत आहे. 'देऊळ बंद 2' ला महाराष्ट्रातील भरघोस प्रतिसाद मिळत आहे. चित्रपटाचे कलेक्शन जाणून घेऊयात.

Shreya Maskar

'देऊळ बंद 2' चित्रपट २१ मे रिलीज

'देऊळ बंद 2' चित्रपटाची जगभरात बक्कळ कमाई

'देऊळ बंद 2' चा मराठीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत समावेश

प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद 2' चित्रपट पाहण्यासाठी स्वामी भक्त थिएटरमध्ये गर्दी करताना पाहायला मिळत आहे. या चित्रपटाने १६ दिवसात जगभरात कोटींचा व्यवसाय केला आहे. तसेच मराठीत सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत आपले नाव कमावले आहे. 'देऊळ बंद 2' चित्रपट २१ मे (गुरुवारी) रिलीज झाला आहे. चित्रपटातील गाणी सोशल मीडियावर प्रचंड गाजत आहे. चित्रपटाने तिसऱ्या शुक्रवारी किती कमावले, जाणून घेऊयात.

'देऊळ बंद २' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १६

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'देऊळ बंद २' चित्रपटाने १६ दिवशी म्हणजे तिसऱ्या शुक्रवारी १,२५१ शोमधून १.४० कोटी रुपयांची नेट कमाई केली. यामुळे भारतातील एकूण ग्रॉस कमाई ६३.४९ कोटी रुपये आणि एकूण नेट कमाई ५४.०० कोटी रुपये इतकी झाली आहे. दिग्दर्शक प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाने जगभरात 65 कोटींहून अधिक कमाई केली आहे. आता तिसऱ्या वीकेंडला चित्रपट किती कोटी कमावतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

  • दिवस १ - ३.०५ कोटी रुपये

  • दिवस २ -३.११ कोटी रुपये

  • दिवस ३ -५.२१ कोटी रुपये

  • दिवस ४ - ६. १० कोटी रुपये

  • दिवस ५ - ३. ७० कोटी रुपये

  • दिवस ६ - ३.३५ कोटी रुपये

  • दिवस ७ - ३.६० कोटी रुपये

  • दिवस ८ - ४.५५ कोटी रुपये

  • दिवस ९ - ३.१० कोटी रुपये

  • दिवस १० - ५ कोटी रुपये

  • दिवस ११ - ५.७५ कोटी रुपये

  • दिवस १२ - २.६० कोटी रुपये

  • दिवस १३ - २.३५ कोटी रुपये

  • दिवस १४ -१.८० कोटी रुपये

  • दिवस १५ -१.८० कोटी रुपये

  • दिवस १६ -१.४० कोटी रुपये

  • एकूण - ५४.०० कोटी रुपये

सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठीतील टॉप ५ चित्रपट

  • राजा शिवाजी (2026): ₹114.8 कोटी

  • सैराट (2016): ₹110 कोटी

  • बाईपण भारी देवा (2023): ₹92 कोटी

  • देऊळ बंद 2 (2026): ₹65 कोटी

  • वेड (2022): ₹75 कोटी

'देऊळ बंद २' चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशींनी स्वामींची भूमिका साकारली. तर अभिनेत्री स्नेहल तरडे शेतकरी महिलेच्या भूमिकेत झळकली. तसेच चित्रपटात महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, देवेंद्र गायकवाड,रमेश परदेशी,ओम भूतकर, सुनील अभ्यंकर, संस्कृती बालगुडे, मुकुंद वसुले, अतुल कुदले, अनिरुद्ध दिंडोरकर आणि हिृषीकेश वांबुरकर हे कलाकार झळकले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कॉकरच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके भारतात दाखल

केस कटिंग, दाढी करण्यासाठी अधिक पैसे मोजा, सलून सेवा 20 टक्क्यांनी महागली; असे असतील नवे दर

Jeera Rice Recipe : जीरा राईस नेहमी चिकट होतो? ही ट्रिक फॉलो, फक्त 15 मिनिटांत तयार होईल डीश

Thepla Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरी बनवा खमंग आणि स्वादिष्ट थेपला, नोट करा रेसिपी

CJP Protest: तिरंगा आणि पुस्तक आणा, सनस्क्रीन लावा...; आंदोलनासाठी कॉकरोच पार्टीची गाईडलाईन

SCROLL FOR NEXT