IPL च्या धामधूमीतही 'देऊळ बंद 2' चित्रपट हाऊसफुल
'देऊळ बंद 2' चित्रपट 21 मे ला रिलीज
'देऊळ बंद 2' चित्रपटाने जगभरात तगडी कमाई केली
जगभरात क्रिकेटचे असंख्य चाहते आहेत. गेलेकाही दिवस सर्वत्र आयपीएलची धामधूम पाहायला मिळत होती. काल (३१ मे २०२६ - रविवारी) आयपीएल २०२६ च्या अंतिम सामना रंगला, ज्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आरसीबी) ने विजेतेपद पटकवले. या विजयामुळे सर्वत्र आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अशातही बॉक्स ऑफिसवर प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद 2' चित्रपटाचा डंका पाहायला मिळत आहे. चित्रपटाने वीकेंडला बंपर कमाई केली आहे. चित्रपटांचे शो हाऊसफुल पाहायला मिळत आहे.
'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला थिएटरमध्ये रिलीज झाला. चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. चित्रपटातून महत्त्वाचा संदेश देण्यात आला आहे. तो असा की, आत्महत्या करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही तर बदलत्या परिस्थितीनुसार शेतीत बदल केल्याने परिस्थितीत सुधारणा करणे गरजेचे आहे. अपरंपार स्वामी भक्ती येथे चित्रपटात पाहायला मिळत आहे. ११ व्या दिवशी चित्रपटाने किती कमावले, जाणून घेऊयात.
Sacnilk च्या रिपोर्टनुसार, प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाने ११ व्या दिवशी म्हणजेच दुसऱ्या रविवारी वीकेंडला २,०१५ शोजमधून ₹५.७५ कोटींचे नेट कमाई केली आहे. शनिवारच्या तुलनेत रविवारी कमाईत वाढ झाली आहे. चित्रपटाला प्रेक्षक भरपूर प्रतिसाद देताना दिसत आहेत. यामुळे आतापर्यंतची भारतातील एकूण ग्रॉस कमाई ₹५१.८३ कोटी आणि एकूण नेट कमाई ₹४४.०५ कोटी रुपये इतकी झाली आहे.'देऊळ बंद २' च्या कमाईत दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळत आहे.
दिवस १ - ३.०५ कोटी रुपये
दिवस २ -३.११ कोटी रुपये
दिवस ३ -५.२१ कोटी रुपये
दिवस ४ - ६. १० कोटी रुपये
दिवस ५ - ३. ७० कोटी रुपये
दिवस ६ - ३.३५ कोटी रुपये
दिवस ७ - ३.६० कोटी रुपये
दिवस ८ - ४.५५ कोटी रुपये
दिवस ९ - ३.१० कोटी रुपये
दिवस १० - ५ कोटी रुपये
दिवस ११ - ५.७५ कोटी रुपये
एकूण - ४४.०५ कोटी रुपये
'देऊळ बंद २' हा चित्रपट 2015 साली रिलीज झालेल्या प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद' चा सीक्वल आहे. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी श्री स्वामी समर्थांची भूमिकेत आणि स्नेहल तरडे महिला शेतकऱ्याची भूमिकेत झळकली आहे. चित्रपटाची गाणी देखील प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.