Deool Band 2 Collection : स्वामींची भक्ती अपरंपार! वीकेंडला 'देऊळ बंद 2' हाऊसफुल, बॉक्स ऑफिसवर प्रवीण तरडेंचा डंका; छप्परफाड कमाईचा आकडा किती?

Pravin Tarde - Deool Band 2- Box Office Collection Day 10 : प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद 2' रिलीज होऊन आता १० दिवस पूर्ण झाले आहेत. चित्रपटाने १० दिवसांत बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटाचे एकूण कलेक्शन जाणून घेऊयात.
Pravin Tarde - Deool Band 2- Box Office Collection Day 10
Deool Band 2 Collectionsaam tv
Published On
Summary

'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला रिलीज

'देऊळ बंद २' चित्रपट वीकेंडला हाऊसफुल

'देऊळ बंद २' शेतकऱ्यांच्या जीवनावर आणि स्वामी भक्तीवर आधारित आहे.

रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'नंतर आता बॉक्स ऑफिसवर प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २'चा गाजावाजा पाहायला मिळत आहे. 'देऊळ बंद २' चित्रपट स्वामी भक्ती आणि शेतकऱ्यांच्या जीवनावर आधारित आहे. 'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला थिएटरमध्ये रिलीज झाला. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळत आहे. चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. चित्रपटाने आतापर्यंत किती कोटींचा व्यवसाय केला, जाणून घेऊयात.

'देऊळ बंद २' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस १०

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाने १० व्या दिवशी १,९४१ शोजमधून ₹५.०० कोटींचे नेट कमाई केली आहे. यामुळे आतापर्यंतचे भारतातील एकूण ग्रॉस कलेक्शन ₹४५.०५ कोटी आणि एकूण नेट उत्पन्न ₹३८.३० कोटी रुपयांवर पोहचले आहे. चित्रपटाच्या कमाईत सतत वाढ होताना दिसत आहे. दुसऱ्या वीकेंडलाही चित्रपट हाऊसफुल पाहायला मिळत आहे. 'देऊळ बंद २'ला महाराष्ट्रातून भरपूर प्रतिसाद मिळत आहे.

  • दिवस १ - ३.०५ कोटी रुपये

  • दिवस २ -३.११ कोटी रुपये

  • दिवस ३ -५.२१ कोटी रुपये

  • दिवस ४ - ६. १० कोटी रुपये

  • दिवस ५ - ३. ७० कोटी रुपये

  • दिवस ६ - ३.३५ कोटी रुपये

  • दिवस ७ - ३.६० कोटी रुपये

  • दिवस ८ - ४.५५ कोटी रुपये

  • दिवस ९ - ३.१० कोटी रुपये

  • दिवस १० - ५ कोटी रुपये

  • एकूण - ३८.३० कोटी रुपये

'देऊळ बंद २' हा चित्रपट 2015 साली रिलीज झालेल्या प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद' चा सीक्वल आहे. 'देऊळ बंद -2' चित्रपटाचा मुख्य हेतू शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना आळा घालणे हा आहे. आत्महत्या करून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही तर बदलत्या परिस्थितीनुसार शेतीत बदल केल्याने परिस्थितीत सुधारणा होईल हा महत्त्वाचा संदेश चित्रपटातून देण्यात आला आहे.'देऊळ बंद -2'मध्ये मराठी दिग्गज अभिनेते मोहन जोशी आणि अभिनेत्री स्नेहल तरडे मुख्य भूमिकेत झळकले आहेत. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी श्री स्वामी समर्थांची भूमिका आणि स्नेहल तरडेने महिला शेतकऱ्याची भूमिका साकारली.

Pravin Tarde - Deool Band 2- Box Office Collection Day 10
Riteish - Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी'चं जगभरात तुफान; रितेश भाऊ महिन्याभरात मालामाल, चित्रपटाच्या कमाईचा आकडा वाचून व्हाल चकित

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com