Pravin Tarde : 'देऊळ बंद २'च्या धामधूमीत प्रवीण तरडेंची मोठी घोषणा; चाहत्यांना दिलं भन्नाट सरप्राइज, वाचा नेमकं काय म्हणालं?

Pravin Tarde Upcoming Movie Big Announcement : प्रवीण तरडेंनी चाहत्यांना मोठी गुडन्यूज दिली आहे. त्यांनी 'देऊळ बंद 2'नंतरच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे.
Pravin Tarde Upcoming Movie Big Announcement
Pravin Tardesaam tv
Published On
Summary

प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद २' बॉक्स ऑफिस गाजवतोय

प्रवीण तरडेंनी आगामी प्रोजेक्टबद्दल केला मोठा खुलासा

आगामी चित्रपटाचे नाव आणि कथेचा विषयही सांगितला

मराठी प्रसिद्ध दिग्दर्शक प्रवीण तरडे सध्या त्यांच्या 'देऊळ बंद 2'मुळे चांगलेच चर्चेत आहे. या चित्रपटाने ३२ कोटींचा टप्पा पार केला आहे. 'देऊळ बंद 2' चित्रपट २१ मे ला रिलीज झाला आहे. या चित्रपटातून स्वामी भक्ती आणि शेतकऱ्यांचे जीवन दाखवण्यात आले आहे. बॉक्स ऑफिसवर 'देऊळ बंद 2' धुमाकूळ घालत असून प्रवीण तरडेंनी चाहत्यांना मोठे सरप्राइज दिले आहे. त्यांनी आगामी प्रोजेक्टबद्दल मोठी घोषणा केली आहे.

'देऊळ बंद 2' निमित्त प्रवीण तरडे आणि त्यांची बायको, अभिनेत्री स्नेहल तरडे विविध थिएटरमध्ये जाऊन प्रेक्षकांना भेटत आहेत. तसेच अनेक मिडिया मुलाखती देत आहेत. अशात 'राजश्री मराठी'ला दिलेल्या मुलाखती प्रवीण तरडेंनी सांगितले की, "देऊळ बंद २ नंतर शक्यतो 'मुळशी पॅटर्न २'कडे मी जाईन...'मुळशी पॅटर्न'मधून मी 'शेती विकायची नसते, ती राखायची असते' " म्हणजेच 'देऊळ बंद २'नंतर 'मुळशी पॅटर्न २' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

'मुळशी पॅटर्न २' चे नाव अन् कथा काय?

'मुळशी पॅटर्न २' च्या विषया संबंधित बोलताना प्रवीण तरडे म्हणाले की, "आपण जेव्हा घर बुक करतो तेव्हा त्याचा मोठा हप्ता भरावा लागतो. त्यामुळे तुमच्या-आमच्या घराचं स्वप्न महाग का झालं? याचं उत्तर 'मुळशी पॅटर्न २' मध्ये मिळणार...चित्रपटाचे नावच आहे- 'मुळशी पॅटर्न २ -तुमच्या घरातच्या भिंतीतल्या वाळूतील गोष्ट' इतका खतरनाक सिनेमा, इतका खतरनाक की, अंगावर काटे, शहारे येईल..."

एकंदर आता लवकरच प्रवीण तरडेंचा बहुप्रतीक्षित चित्रपट 'मुळशी पॅटर्न २ ' चे शूटिंग सुरू होणार आहे. चाहते या चित्रपटासाठी खूपच उत्सुक आहेत. 2018 ला 'मुळशी पॅटर्न' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

Pravin Tarde Upcoming Movie Big Announcement
Famous Choreographer : "माझ्यासोबत एक रात्र घालव, मला तुझ्यापासून मुल हवंय..." ; महिला चाहतीची ऑफर, प्रसिद्ध कोरिओग्राफर झाला थक्क

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com