Deool Band 2 Collection : स्वामी नामाचा गजर! 'देऊळ बंद २'नं 'राजा शिवाजी' ला पछाडलं; प्रवीण तरडेंचा बॉक्स ऑफिसवर जलवा, कमाई वाचून बसेल धक्का

Pravin Tarde - Deool Band 2- Box Office Collection Day 6 : प्रवीण तरडेंचा 'देऊळ बंद २' बॉक्स ऑफिसवर सुसाट पाहायला मिळत आहे. 'देऊळ बंद २' चित्रपटाने 'राजा शिवाजी' सिनेमाला मागे टाकले आहे. एकूण कलेक्शन जाणून घेऊयात.
Pravin Tarde - Deool Band 2- Box Office Collection Day 6
Deool Band 2 Collectionsaam tv
Published On
Summary

'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे ला रिलीज झाला.

'देऊळ बंद २' चित्रपटाने 'राजा शिवाजी' चित्रपटाला मागे टाकले.

'देऊळ बंद २' चित्रपट प्रवीण तरडे दिग्दर्शित आहे.

'देऊळ बंद २' हा चित्रपट 2015 साली रिलीज झालेल्या प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद' चा सीक्वल आहे. 'देऊळ बंद २' मधून शेतकऱ्यांची परिस्थिती आणि त्याला स्वामी भक्तीची जोड दाखवण्यात आली आहे. या चित्रपटाला महाराष्ट्रातून भरघोस प्रतिसाद मिळत आहे. रिलीजच्या ६ व्या दिवशी चित्रपटाने रितेश भाऊंच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला मागे टाकले आहे. 'देऊळ बंद २' चित्रपट २१ मे (गुरुवारी) रिलीज झाला. चित्रपटाची एकूण कमाई जाणून घेऊयात.

'देऊळ बंद २' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ६

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, प्रवीण तरडेंच्या 'देऊळ बंद २' चित्रपटाने ६ व्या दिवशी १,८६३ शोजमधून ₹३.३५ कोटींचे नेट कमाई केली आहे. 'देऊळ बंद २' या चित्रपटाने रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाला मागे टाकले आहे. 'राजा शिवाजी'नं सहाव्या दिवशी मराठीत आवृत्तीत ३.०० कोटींची कमाई केली होती तर हिंदी आवृत्तीत १.२५ कोटींचा व्यवसाय केला. म्हणजेच ६ व्या दिवसाच्या कलेक्शनमध्ये 'देऊळ बंद २' ने 'राजा शिवाजी' ला मागे टाकले आहे. येणाऱ्या वीकेंडला 'देऊळ बंद २' किती कमावणार, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

  • दिवस १ - ३.०५ कोटी रुपये

  • दिवस २ -३.११ कोटी रुपये

  • दिवस ३ -५.२१ कोटी रुपये

  • दिवस ४ - ६. १० कोटी रुपये

  • दिवस ५ - ३. ७० कोटी रुपये

  • एकूण - २१. १७ कोटी रुपये

'देऊळ बंद -2'मध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारली तर महिला शेतकऱ्याच्या भूमिकेत स्नेहल तरडे दिसल्या आहेत. चित्रपटाची कथा, संवाद आणि दिग्दर्शन प्रवीण तरडे यांनी केले आहे. चित्रपटात महेश मांजरेकर, प्रसाद ओक, मंगेश देसाई, देवेंद्र गायकवाड,रमेश परदेशी,ओम भूतकर, सुनील अभ्यंकर, संस्कृती बालगुडे, मुकुंद वसुले, अतुल कुदले, अनिरुद्ध दिंडोरकर आणि हिृषीकेश वांबुरकर हे कलाकार झळकले आहेत.

Pravin Tarde - Deool Band 2- Box Office Collection Day 6
Veen Doghantali Hi Tutena : पेपरात जाहिरात, टिव्हीवर बातमी; हटके स्टाइलमध्ये समर देणार स्वानंदीला प्रेमाची कबुली, VIDEO पाहून तुमचे भान हरपेल

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com