'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत मोठा ट्विस्ट
समर करणार स्वानंदीला प्रपोज
नव्या नात्याची वीण घट्ट होणार
सध्या सर्वत्र 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेची चर्चा पाहायला मिळत आहे. समर-स्वानंदीचे नाते प्रेमाने फुलताना दिसत आहे. अलिकडेच स्वानंदी दारूच्या नशेत समरसमोर तिच्या प्रेमाची कबुली देते. किमयाच्या एक्झिटनंतर मालिकेत खऱ्या अर्थाने रोमँटिक वळण येताना दिसत आहे. नुकताच एक प्रोमो समोर आला आहे, ज्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. जो पाहून चाहते मालिकेसाठी खूपच उत्सुक झाले आहे. समर-स्वानंदीचे नाते कोणते वळण घेणार पाहूया.
समर स्वानंदीला फुल रोमँटिक अंदाजत प्रपोज करतात. स्वानंदी सकाळी उठून वर्तमानपत्र पाहते तर त्यात तिला स्वतःचा फोटो दिसतो. त्यात लिहिलं असतं की, "स्वानंदी आज भेटुयात…७:३० वाजता वरळीला!" हे पाहून ती राजवाडेंना फोन करते मात्र ते उचलत नाही. त्यानंतर स्वानंदी स्कुटीने ऑफिसला जायला निघते तेव्हा रस्त्यावर मोठमोठे होर्डिंग्स दिसतात. त्यावरही स्वानंदीचा फोटो आणि मेसेज पाहायला मिळतो. जेव्हा स्वानंदी ऑफसला पोहचते तेव्हा ती टिव्हीवरही स्वतःला पाहते. तिला नेमकं काय सूरू असते ते काही कळत नाही.
स्वानंदी शेवटी संध्याकाळ वरळी सी-लिंककडे पोहोचते. त्यावर स्वानंदीचा भलामोठा फोटो झळकतो आणि त्यावर बाजूला लिहिलं असते की, "आय लव्ह यू, स्वानंदी..." हे पाहून स्वानंदीची कळी खुलते. त्यानंतर समर तिच्या समोर येतो आणि आपल्या प्रेमाची कबुली देतो. समर हातात गुलाबाचे फुल घेऊन बोलतो की, "तडजोडीचे नाते इतके सुंदर असू शकते, असा कधी विचार केला नव्हता...तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि माझ्या आयुष्याला नवीन अर्थ मिळाला...थँक्यू स्वानंदी मॅडम..." तेव्हा स्वानंदी म्हणते, "थँक्यू?" तेव्हा समर बोलतो की, "आय लव्ह यू स्वानंदी मॅडम..." हे एकताच स्वानंदी खूप लाजते आणि समरला मिठी मारते.
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "समर-स्वानंदी एकमेकांचं प्रेम स्वीकारणार, नव्या नात्याची वीण घट्ट होणार!" या व्हिडीओवर चाहते, प्रेक्षक कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. "समर-स्वानंदीची जोडी सुपरहिट", "तेजश्री प्रधान आणि सुबोध भावे यांची केमिस्ट्री खूपच सुंदर आहे...", "खऱ्या अर्थाने मालिका आता सुरू झाली...", "दोघेही खूप क्यूट आहेत...शेवटी त्यांची प्रेमकहाणी सुरू होतेय...", "आता खऱ्या अर्थाने मालिका आणि गोष्ट सुरू झाली... खूप उत्साही आहे", "आता मालिका पाहायला मजा येणार...जून महिन्यात वीण अजून घट्ट होणार...", "दोघेही एकमेकांवरचे प्रेम कबुल करतात...जून महिन्यासाठी खूप उत्साही आहे..." अशा भरपूर कमेंट्स मालिकेच्या प्रोमो व्हिडीओवर पाहायला मिळत आहे.
'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका 'झी मराठी' वाहिनीवर संध्याकाळी 7:15 pm वाजता पाहायला मिळते. आता समर-स्वानंदी एकत्र आल्यावर मालिकेत कोणते मोठे ट्विस्ट येणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तसेच दोघांनी एकमेकांना प्रेमाची कबुली दिल्यानंतर त्यांचे प्रेम कसे फुलणार, नात्यात कोणते चढ-उतार येणार? हे सर्वच पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.