Shree Paduka Darshan: भक्तीचा महाकुंभ! ढोल-ताशांच्या गजरात २१ पादुकांचे जंगी स्वागत; वरळी डोममध्ये घेता येणार दर्शन | VIDEO

Shree Paduka Darshan Sohala Video: सकाळ माध्यम समूहाच्या वतीने वरळीच्या NSCI डोममध्ये श्रीगुरु पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात २१ पादुकांचे ढोल ताशांच्या गजरात स्वागत केले आहे.

भक्ती आणि श्रद्धेचा अपूर्व संगम असलेल्या श्रीगुरू पादुका दर्शन सोहळ्याला आजपासून सुरुवात झाली आहे. मुंबईत मोठ्या उत्साहात हा सोहळा संपन्न होणार आहे. सकाळ माध्यम समूहाच्या वतीने वरळीच्या NSCI डोममध्ये या भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.भाविकांना संत आणि सद्गुरूंच्या २१ मूळ पादुकांचे दर्शन एकाच छताखाली घेण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

या सोहळ्यासाठी भाविकांना विनामूल्य प्रवेश देण्यात येत आहे. सकाळी 10 ते रात्री 9 वाजेपर्यंत आज आणि उद्या तुम्हाला संताच्या पादुकांचं दर्शन घेता येणार आहे. येथे २१ संतांच्या पादुका दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. या २१ पादुकांचे वरळी डोम येथे आगमन झाले आहे. ढोल-ताशांच्या गजरात मोठ्या भक्तिभावाने या पादुका वरळी डोम येथे आणण्यात आल्या आहेत. या पादुकांचे दर्शन तुम्ही घेऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com