Dnyaneshwar Mauli : नांदेडच्या दांपत्याची भक्ती! माऊलीच्या चरणी १ किलो सोन्याचा मुकूट अर्पण, किंमत तब्बल...

Nanded couple donates gold crown to Sant Dnyaneshwar : नांदेडचे भारत व मिरा रामिनवार यांनी संत ज्ञानेश्वर माऊलींना एक किलो सोन्याचा, एक कोटी रुपये किंमतीचा मुकूट अर्पण केला. आषाढी एकादशीच्या दिवशी आळंदी येथे ही भक्तिभेट समर्पित करण्यात आली. महाराष्ट्रभर या भक्तीची चर्चा होत आहे.

Devotional gift worth ₹1 crore at Sant Dnyaneshwar’s temple : नांदेड येथील उद्योजक भारत रामिनवार आणि त्यांच्या पत्नी मिरा रामिनवार यांनी आळंदीतील संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरात एक किलो सोन्याचा भव्य मुकुट अर्पण केला. एक कोटी रुपये किंमत असलेला हा भव्य मुकुट एका महिन्याच्या उत्कृष्ट कारागिरीनंतर तयार झाला. हा मुकुट पारंपरिक नक्षीकाम, धार्मिक प्रतीकांची कोरीव रचना आणि आधुनिक 3D तंत्रज्ञानाने सजवलेला आहे.

आषाढी एकादशीच्या पवित्र प्रसंगी हा मुकुट माऊलींच्या चरणी समर्पित करण्यात आला. या सोहळ्यासाठी मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी जमली होती. रामिनवार दांपत्याने ही भक्तीची अनमोल भेट संत ज्ञानेश्वरांच्या कार्याला वंदन म्हणून अर्पण केल्याचे सांगितले. यामुळे नांदेडसह महाराष्ट्रभरात त्यांच्या भक्तीची चर्चा आहे. मंदिर प्रशासनाने या दानाचे स्वागत करत भक्तांच्या श्रद्धेचा हा आदर्श असल्याचे म्हटले.

गेल्या १२ वर्षांपासून भारत रामीनवार वारीत सहभागी होतात. दरवर्षी त्यांचं कुटुंब अन्नदानाचे आयोजन करतं. या दातृत्वामुळे नांदेडसह राज्यभरात त्यांच्या भक्तीची चर्चा आहे. मंदिर प्रशासनाने या भेटीचे कौतुक करत रामीनवार दांपत्याच्या श्रद्धेचे कौतुक केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com