Prajakta Mali SAAM TV
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali : माझं ठरलंय... मी कुठल्याही दारू किंवा तंबाखूच्या जाहिराती करणार नाही, प्राजक्ता माळीची रोखठोक भूमिका

Prajakta mali news: प्राजक्ता माळी नेहमीच काहीना काही कारणामुळे चर्चेत असते,नुकत्याच तिने दिलेल्या एका मुलाखतीमध्ये स्पष्ट केले आहे की ती कुठल्याही पान मसाला आणि दारूची जाहिरात करणार नाही.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी चित्रपट क्षेत्रात खूप कमी वेळात आपल्या नावाची छाप पाडणारी प्राजक्ता माळीचा काही दिवसापूर्वी फुलवंती चित्रपट प्रकाशित झाला. हा सिनेमा संपूर्ण राज्यात सुपरहिट ठरला. "तुम्ही अभिनेत्री आणि नृत्यांगना आहात, पण उत्पन्नाचे इतर कोणते स्त्रोत असावेत? या प्रश्नावर तिने तिचे विचार मांडले.

आपल्याला आयुषात काही आवडी-निवडी असल्या पाहिजेत.आपण फक्त पोटासाठीच नाही कमावले पाहिजे असे मत प्राजक्ताने मांडले; तसेच आपल्यावर गोष्टी कोणी लादल्या नाही पाहिजे. सुरुवातीच्या काळात मी काही ब्रॅंड्ससाठी काम केले. कोरोनानंतर मला या गोष्टींची जाणीव झाली. कलाक्षेत्रावर तुम्ही पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या अवलंबून राहू शकत नाही. आज जी स्थिति आहे ती कदाचित उद्या नसते. त्यामुळे तुम्ही पूर्णपणे यावर अवलंबून राहू नये, असे स्पष्ट मत प्राजक्ता माळीने मांडले.

आपल्या कामात १०० टक्के योगदान देणे महत्त्वाचे असते. पण पैसा योग्य मार्गानेच कमवला पाहिजे.
प्राजक्ता माळी, अभिनेत्री

पुढे ती म्हणाली, आपण असे काम करायला हवे जे करताना आपल्याला आनंद देईल आणि त्यातून योग्य उत्पन्न मिळेल. या विचारातून मी मराठी अलंकारांचा व्यवसाय सुरू केला. त्यामध्ये मी कलाकार म्हणून त्यात मी योगदान दिले. मराठी राजघराण्यांचे जे अलंकार आहेत, त्याचा मी सखोल अभ्यास केला. खूप वाचन केले. त्यामुळे आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला असे तिने सांगितले.

आपल्या कामात शंभर टक्के योगदान देणे महत्त्वाचे असते, पण पैसा योग्य मार्गानेच कमवला पाहिजे, असे स्पष्ट करत तिने सांगितले, मला अशा अनेक मोठ्या ब्रँड्सकडून जाहिरातीसाठी ऑफर्स येतात, ऑनलाइन जुगाराचे अॅप्स आणि नावाजलेल्या कंपन्यांचेही प्रस्ताव येतात, पण मी ते ठामपणे नाकारते. मला अभिनयातून पैसा कमवायचा आहे, कुठल्या चुकीच्या गोष्टीतून मला पैसे अजिबात कमवायचे नाहीत, असे स्पष्ट मत प्राजक्ताने मांडले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Indrayani : इंद्रायणीची घोषणा! दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर होणार शाळेची पायाभरणी, कोण असणार खास व्यक्ती?

Shocking : धक्कादायक प्रकार! अंगणवाडीच्या खाऊमध्ये आढळला मेलेला उंदीर

गर्लफ्रेंडचे अश्लील व्हिडिओ, धमक्या अन् बलात्कार; कल्याणच्या राजकीय पक्षातील तरूणानं प्रेयसीला छळलं

Maharashtra Live News Update : अक्कलकोट स्वामी समर्थांचे मंदिर राहणार 20 तास खुले

Garib Rath Express : ब्रेकिंग न्यूज! गरीब रथ ट्रेनच्या ३ एसी बोगीला भयंकर आग, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT