Prajakta Mali SAAM TV
मनोरंजन बातम्या

Prajakta Mali : प्राजक्ता माळी अन् गश्मीर महाजनीने दिली गुडन्यूज, चित्रपटाबाबत सांगितली महत्त्वाची अपडेट

Prajakta Mali- Gashmeer Mahajani Video : प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांनी एक व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. ते नेमकं काय म्हणाले जाणून घेऊयात.

Shreya Maskar

प्राजक्ता माळीचा मराठी चित्रपट 'फुलवंती' जगभर खूप गाजला.

प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांनी चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे.

'फुलवंती'मध्ये प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी मुख्य भूमिकेत झळकले आहेत.

मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) 'फुलवंती' (phullwanti ) चित्रपटामुळे कायम चर्चेत असते. नुकतीच 'फुलवंती'बद्दल मोठी अपडेट समोर आली आहे. 'फुलवंती' चित्रपट 11 ऑक्टोबर 2024ला थिएटरमध्ये रिलीज झाला. त्यानंतर 22 नोव्हेंबर 2024ला चित्रपट प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळाला. 'फुलवंती' चित्रपटाचे जगभरात चाहते असल्यामुळे 'फुलवंती' हिंदीत यावा असे अनेकांना वाटत होते. तशी इच्छाही प्रेक्षकांकडून व्यक्त करण्यात आली होती.

नुकताच प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. ज्यात त्यांनी 'फुलवंती' चित्रपटाविषयी मोठी अपडेट चाहत्यांना दिली आहे. व्हिडीओत सांगितल्यानुसार 'फुलवंती ' हा चित्रपट आता हिंदी भाषेत पाहायला मिळणार आहे. 2024 ला थिएटर रिलीजनंतर 'फुलवंती' अ‍ॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्म मराठीत पाहायला मिळाला. आता चित्रपट अ‍ॅमेझॉन प्राइमवर हिंदी भाषेत उपलब्ध आहे.

डबिंग कोणी केलंय?

'फुलवंती ' चित्रपटाचे हिंदीत डबिंगही प्राजक्ता माळी आणि गश्मीर महाजनी यांनी केले आहे. त्यांचाच आवाज तुम्हाला हिंदीतही ऐकू येणार आहे. चित्रपटातील गाणी देखील सुंदररित्या हिंदीत डब करण्यात आली आहेत. तसेच 'फुलवंती' च्या हिंदी गाण्याचा एक वेगळा अल्बम तयार करण्यात आला आहे. व्हिडीओला खास कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "फुलवंती अब हिंदी में...देर आए दुरुस्त आए!" या व्हिडीओ चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्स, शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

'फुलवंती' चित्रपटातून प्राजक्ता माळीने निर्मिती क्षेत्रात पदार्पण केले. तसेच चित्रपटाचे दिग्दर्शन अभिनेत्री स्नेहल तरडेने केले. 'फुलवंती' चित्रपटातील गाणी आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत. 'फुलवंती' हा चित्रपट बाबासाहेब पुरंदरे यांच्या कादंबरीवर आधारित आहे.'फुलवंती'ने छप्परफाड कमाई केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कोणतरी गेलं बाबा मला मारलं..., उद्धव ठाकरेंनी उडवली एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याची खिल्ली|VIDEO

Maharashtra Live News Update: पुणे महापालिकेची प्रारूप मतदार यादी जाहीर

Asambhav: नव्या नात्यातील दरवळ बहरणार; मुक्ता बर्वे आणि सचित पाटील यांची रोमॅन्टिक केमेस्ट्री प्रेक्षकांच्या समोर

Whatsapp Number Leak: सावधान! आतापर्यंतचा सर्वात मोठा डेटा लीक, व्हॉट्सअ‍ॅपवरील ३.५ अब्ज युजर्सचे मोबाइल नंबर चोरी

Weight Loss: वजन घटवण्यात सेमाग्लुटाइडचा नवा वैज्ञानिक फॉर्म्युला ठरतोय गेमचेंजर

SCROLL FOR NEXT