Madhuri Dixit New Web Series
Madhuri Dixit SAAM TV

Madhuri Dixit : 'धकधक गर्ल' सोबत झळकणार 'हा' मराठमोळा अभिनेता, नवीन वेब सीरिजची घोषणा

Madhuri Dixit New Web Series : बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षितच्या नवीन वेब सीरिजचा टीझर समोर आला आहे. यात 'धकधक गर्ल' सोबत मराठी अभिनेता देखील झळकणार आहे.
Published on
Summary

माधुरी दीक्षितच्या नवीन वेब सीरिजचा टीझर समोर आला आहे.

माधुरी दीक्षितसोबत मराठमोळा अभिनेता झळकणार आहे.

माधुरी दीक्षितच्या सीरिजमधील फर्स्ट लूकनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' लवकरच एका नवीन प्रोजेक्टमधून चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. प्रेक्षक तिच्या अभिनयाचे दिवाने आहेत. जगभरात माधुरी दीक्षितचे लाखो चाहते आहेत. नुकतीच माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) सोशल मीडियावर पोस्ट करून आपल्या नवीन प्रोजेक्टची घोषणा केली आहे. माधुरी दीक्षित आता एका वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

माधुरी दीक्षितच्या नव्याकोऱ्या वेब सीरिजचे नाव 'मिसेस देशपांडे' असे आहे. ही एक सायकोलॉजिकल थ्रिलर सीरिज आहे. चाहते यासाठी खूपच उत्सुक आहेत. या सीरिजचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या सीरिजमध्ये माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत दिसणार आहे. टीझरमध्ये माधुरी दीक्षित पारंपरिक लूकमध्ये आरशासमोर मेकअप, दागिने काढताना दिसते आणि अचानक वेगळ्या रुपात येते. तिच्या डोळ्यात एक वेगळी आग पाहायला मिळते.

'मिसेस देशपांडे'मध्ये माधुरी दीक्षितसोबत एक प्रसिद्ध मराठमोळा अभिनेता झळकणार आहे. हा अभिनेता दुसरा तिसरा कोणी नसून सिद्धार्थ चांदेकर आहे. सिद्धार्थने सोशल मीडियावर एक स्टोरी शेअर केली आहे. स्टोरीला त्याने 'मिसेस देशपांडे'चा टीझर शेअर करून 'My Next' असे कॅप्शन दिलं आहे. त्यामुळे आता 'मिसेस देशपांडे' सीरिजमध्ये अभिनेता सिद्धार्थ चांदेकर दिसणार आहे. पहिल्यांदाच माधुरी दीक्षितसोबत सिद्धार्थ चांदेकर स्क्रीन शेअर करणार आहे.

'मिसेस देशपांडे' च्या टीझरवर चाहते आणि कलाकारांकडून कमेंट्स आणि लाइक्सचा वर्षाव होत आहे. तर प्रेक्षक माधुरी दीक्षित आणि सिद्धार्थ चांदेकरला नवीन प्रोजेक्टसाठी शुभेच्छा देत आहेत. 'मिसेस देशपांडे' वेब सीरिजचे दिग्दर्शक नागेश कुकुनूर आहे. माधुरी दीक्षितचा सीरिजमधील फर्स्ट लूकनं सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. ही ही सीरिज लवकरच जिओ हॉटस्टारवर पाहता येणार आहे.

Madhuri Dixit New Web Series
Arbaaz Khan Baby Photo : अरबाज-शूराने दाखवली लाडक्या लेकीची पहिली झलक, एकदा फोटो बघाच

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com