Manasvi Choudhary
अभिनेत्री प्राजक्ता माळीने तिच्या इन्स्टाग्रामवर नुकतीच एक पोस्ट केली आहे जी सध्या सर्वाचेच लक्ष वेधून घेत आहे.
प्राजक्ता माळीने तिच्या पोस्टमध्ये बाय बाय मुंबई, मला तुझी खूप आठवण येईल, मी लवकरच परतेल असं म्हटलं आहे.
मात्र प्राजक्ताची ही पोस्ट पाहून तिच्या चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत.
प्राजक्ता नेमकं चालली तरी कुठे?, प्राजक्ताने नेमंक का सोडली असेल मुंबई? असे अनेक प्रश्न तिचे चाहते विचारत आहेत.
तिचे अनेक फोटो देखील व्हायरल होत असतात. प्राजक्ताचा चाहतावर्ग मोठा आहे. प्राजक्ता माळीच्या या स्टोरी पोस्टने चाहत्यांची धडधड वाढली आहे.
मात्र तिच्याच पुढील पोस्टने चाहत्यांच्या प्रश्नांला उत्तर मिळालं आहे. प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या टीमसोबत कार्यक्रमानिमित्त बाहेर गेली आहे.
सोशल मीडियावर प्राजक्ता कायमच चाहत्यांना अपडेट देत असते. आतादेखील प्राजक्ताने तिचे बरेच फोटो पोस्ट केले आहेत.