Nita Ambani Crying Anant- Radhika Sangeet Ceremony Social Media
मनोरंजन बातम्या

Anant- Radhika Sangeet Ceremony : अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात नीता अंबानी स्टेजवर रोहितला मिठी मारली आणि रडल्या; नेमकं कारण काय?

Anant- Radhika Sangeet Ceremony News : अनंत- राधिका यांच्या संगीत सोहळ्यामध्ये नीता अंबानी भावुक झाल्या आहेत. रडतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जाणून घेऊया नेमक्या त्या का रडल्या.

Chetan Bodke

टीम इंडियाने टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या फायनल सामन्यात दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभूत करत दुसऱ्यांदा विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. तब्बल ११ वर्षांनंतर हा विश्वचषक भारताला मिळाला आहे. विश्वचषकावर भारताने आपलं नाव कोरल्यानंतर अवघ्या देशभरातून संपूर्ण टीमचं कौतुक केले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज मंडळींनी टीम इंडियाचे कौतुक केले आहे. सर्वच स्तरातून टीम इंडियाचं कौतुक होत असताना अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यातही रोहित शर्मा, हार्दिक पांड्या, सुर्याकुमार यादव, इशान किशन यांचं कौतुक करण्यात आलं.

अंबानी कुटुंबीयांकडून टीम इंडियाचं कौतुक होत असल्याचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनंत- राधिकाच्या संगीत सोहळ्यासाठी सेलिब्रिटी, क्रिकेटर, बिझनेसमन आणि राजकीय मंडळींनी उपस्थिती लावली होती. सध्या एक्सवर या इव्हेंटमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नीता अंबानी स्टेजवर टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा, सुर्याकुमार यादव, हार्दिक पांड्या या तिघांनाही बोलावतात. त्यानंतर त्यांच्या दमदार खेळीचे कौतुक करत सर्वांनाच यावेळी स्टँडिंग ओव्हेशन मिळालेले आहे. पण असं असलं तरीही टीम इंडियाचं कौतुक करत असताना नीता अंबानी ढसाढसा रडल्या आहेत.

नीता अंबानी कॅप्टन रोहित शर्माचं कौतुक करत असताना त्याचे डोळे पाणावले. सध्या सर्वत्रच टीम इंडियाचे कौतुक होत असताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत सोहळ्यातला हा व्हिडिओ जॉन्स नावाच्या एका युजरने शेअर केलेली आहे. गुरूवारी सकाळी टीम इंडिया बार्बाडोसवरून भारतात परतली. भारतात आल्यानंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

पंतप्रधानांनी टीम इंडियाच्या दमदार खेळीचं जोरदार कौतुक केलं. त्यानंतर संध्याकाळी मुंबईमध्ये टीम इंडिया विजयी परेडमध्ये सहभागी झाली होती. यावेळी मोठ्या प्रमाणावर मुंबईकर उपस्थित होते. महाराष्ट्राच्या विधिमंडळात शुक्रवारी रोहित शर्मासह मुंबईकर खेळाडूंचा सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खेळाडूंना १ कोटी तर भारतीय संघाला ११ कोटींचं बक्षीसही जाहीर केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dahihandi 2025 : दहीहंडीमध्ये २ गोविंदाचा मृत्यू; ९५ जण जखमी, कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती जण अॅडमिट, जाणून घ्या

Mumbai Lake Water Level : मुंबईकरांसाठी खूशखबर! तुळशी तलाव ओव्हरफ्लो, ७ तलावात किती पाणीपुरवठा?

Konkan Railway: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; रेल्वेनं घेतला मोठा निर्णय

Ajit Pawar Rohit Pawar : अजित पवार विरूद्ध रोहित पवार, दादांचा पुतण्याला दम

Mumbai Dahi Handi 2025 : मुंबईत दहीहंडी उत्सवाला गालबोट; आणखी एका गोविंदाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT