Team India: वर्ल्डकपचे हिरो वर्षा बंगल्यावर! रोहितसह या 3 खेळाडूंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून सत्कार- VIDEO

Team India Meet Eknath Shinde: भारतीय संघातील खेळाडूंनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा बंगल्यावर भेट घेतली आहे.
Team India: वर्ल्डकपचे हिरो वर्षा बंगल्यावर! रोहितसह या 3 खेळाडूंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून सत्कार- VIDEO
rohit sharma eknath shindetwitter

भारतीय संघाने अमेरिका आणि वेस्टइंडिजमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेचा थरार पारा पडला. या स्पर्धेत भारतीय संघाने शानदार कामगिरी केली आणि फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. यासह दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. भारतीय संघाला गेली १७ वर्ष आयसीसी टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी जिंकता आली नव्हती. मात्र रोहिती शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने करुन दाखवलं. दरम्यान वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघातील खेळाडूंचा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून सत्कार करण्यात आला आहे.

(बातमी अपडेट होत आहे.)

भारतीय संघातील खेळाडूंनी दिल्लीत नरेंद्र मोदींची भेट घेतली. मोदींच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर खेळाडूंनी मोदींसोबत संवाद साधला. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते वर्षा बंगल्यावर खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार झाल्यानंतर हे चारही खेळाडू विधानभवनात जाणार आहेत. विधान भवनातील सेंट्रल हॉलमध्ये या चारही खेळाडूंचा सत्कार करण्यात येणार आहे. विधानभवनात खेळाडूंचं लेझिम आणि ढोल ताशांच्या गजरात स्वागत केलं जाणार आहे.

Team India: वर्ल्डकपचे हिरो वर्षा बंगल्यावर! रोहितसह या 3 खेळाडूंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून सत्कार- VIDEO
IND-W vs SA-W: टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय! दक्षिण आफ्रिकेला 10 विकेट्सने लोळवलं

वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदेंनी खेळाडूंसोबत संवाद साधला. त्यानंतर चारही खेळाडूंचा शाल आणि गणपतीची मुर्ती देऊन सत्कार केला. भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी विजय मिळवला होता. या सामन्यतील फायनलमध्ये विराट कोहलीने निर्णायक ७६ धावांची खेळी करत संघाला मजबूत स्थितीत पोहोचवलं होतं. दरम्यान विराट कोहली या सामन्याचा हिरो ठरला होता.

Team India: वर्ल्डकपचे हिरो वर्षा बंगल्यावर! रोहितसह या 3 खेळाडूंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून सत्कार- VIDEO
Team India Victory Parade: टीम इंडियाच्या विजय रॅलीदरम्यान अनेकांचा दम घुसमटला; मरीन ड्राइव्हला चपलांचा खच; पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com