Ranbir Kapoor : बालपणीच्या कोणत्या आठवणीमुळे रणवीर कपूर आजही होतो डिस्टर्ब ? स्वत:च केला खुलासा

Ranbir Kapoor Share Disturbing Childhood Memory : सध्या रणबीर आणि करीना कपूरचा एका मुलाखतीचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. ज्यामध्ये, त्यानं बालपणीची अतिशय वाईट आठवण सांगितली आहे.
Ranbir Kapoor Share Disturbing Childhood Memory
Ranbir Kapoor NewsSaam Tv

सध्या रणबीर आणि करीना कपूरचा एका मुलाखतीचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आहे. ज्यामध्ये, त्यानं बालपणीची अतिशय वाईट आठवण सांगितली आहे. हा व्हिडिओ करण जोहरच्या शोमधील आहे. ज्यामध्ये तो त्याच्या लहानपणीच्या काही आठवणी शेअर करत आहे. हा व्हिडीओ खूप वर्षांपूर्वीचा आहे, मात्र यात रणबीरच्या त्या आठवणींची चांगलीच चर्चा होते आहे.

Ranbir Kapoor Share Disturbing Childhood Memory
Neeta And Mukesh Ambani Dance : अनंत- राधिकाच्या संगीत सोहळ्यात मुकेश- नीता अंबानी यांचा रोमँटिक डान्स; सलमान-रणबीरही पडले फिके, पाहा VIDEO

काय आहे ती लहानपणीची आठवण?

रणबीर कपूरने त्याची बहीण रिधिमा आणि करीनाच्या लहानपणीच्या आठवणी सांगितल्या. आठवणी सांगताना रणबीरने सांगितलं की, "आम्ही लहान असताना करीना आणि रिधिमा घर घर खेळायचो. मी तेव्हा ४ वर्षांचा होतो आणि या दोघी ६ वर्षांच्या असतील. त्यांच्या घर घर खेळण्यात त्या मला दोघांपैकी एकाचा नवरा बनायला लावायच्या. त्यामुळे त्या खेळात मी कधी करीनाचा नवरा असायचो तर कधी रिधिमाचा. मला मात्र या गोष्टीचा फार त्रास होतो आणि आजही ती गोष्ट आठवली की, मी डिस्टर्ब होतो." असं रणबीर या मुलाखतीत म्हणाला.

दरम्यान याबाबत करीनाला विचारलं असता तिने सांगितले की, मला याबाबत काहीच आठवत नसल्याचं सांगितलंय. आम्ही असं काही खेळायचो हे फार दुर्दैवी आहे आणि ते मला काही आठवत नाही हे खूप चांगलं आहे. मात्र या बहीण भावाच्या नात्यात लहानपणीच्या आठवणीमुळे काहीसा गोंधळ झाल्याचं रणबीरनं सांगितलं आहे. त्यामुळे त्या आठवणी न आठवलेल्याच बऱ्या असंही रणबीरनं म्हटलंय. या मुलाखतीत करिनानं तिच्या वहिनीविषयीही भाष्य केलंय. अर्थात हा व्हिडिओ जुना असल्यानं त्याच्या आयुष्यात आलिया नव्हती, तर कतरिना होती. त्यामुळे तिला करणनं वहिनीबद्दल विचारलं असता, मी कतरिनाबद्दल खूप खूश आहे आणि कम्फर्टेबल आहे. असं करिना म्हणाली होती.

Ranbir Kapoor Share Disturbing Childhood Memory
Mirzapur 3 Review : कोणत्या ५ कारणांमुळे 'मिर्झापूर ३' सीरीज रटाळ वाटते ? वाचा सविस्तर

सध्या त्यांचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर चर्चेत आलाय. रणबीर आणि करीना हे चूलत भाऊ बहिण आहे. आणि त्यांचं नातं अतिशय चांगलं आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचं लग्न झालंय, त्यांना एक गोड मुलगीसुद्धा आहे. राहा असं तिचं नाव आहे.

Ranbir Kapoor Share Disturbing Childhood Memory
Ranveer Singh Net Worth : एकेकाळी कॅफेतही केलंय रणवीर सिंहने काम; आज आहे कोट्यवधींचा मालक, दीपिकाच्या नवऱ्याची नेटवर्थ किती?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com