Ranveer Singh Net Worth : एकेकाळी कॅफेतही केलंय रणवीर सिंहने काम; आज आहे कोट्यवधींचा मालक, दीपिकाच्या नवऱ्याची नेटवर्थ किती?

Ranveer Singh Birthday : मजेशीर स्वभाव आणि हटके फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या रणवीर सिंहचा आज वाढदिवस आहे. विशेष आपल्या अभिनयामुळे नाही तर विचित्र स्वभावामुळे रणवीरची कायमच चर्चा होत असते.
Ranveer Singh Birthday
Ranveer Singh Net Worth Saam Tv

मजेशीर स्वभाव आणि हटके फॅशनमुळे चर्चेत राहणाऱ्या रणवीर सिंहचा आज वाढदिवस आहे. विशेष आपल्या अभिनयामुळे नाही तर विचित्र स्वभावामुळे रणवीरची कायमच चर्चा होत असते. 'बॅन्ड बाजा बारात' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या रणवीर सिंगचे लाखो चाहते आहेत. सहाय्यक दिग्दर्शक ते सुप्रसिद्ध अभिनेता असा रणवीर सिंहचा दमदार प्रवास आहे. आज रणवीरच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या संपत्तीवर एक नजर टाकूया...

Ranveer Singh Birthday
Ranveer Singh Birthday : लेखक ते 'गल्ली बॉय'; सुपरस्टार रणवीर सिंगचा कसा आहे जीवनप्रवास?, जाणून घ्या...

बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्याआधी रणवीर स्क्रिप्ट रायटर म्हणून काम करायचा. त्याने आपल्या करियरची सुरूवातही स्क्रिप्ट रायटर म्हणूनच केली आहे. बॉलिवूडच्या सुपरहिट कलाकारांच्या यादीमध्ये रणवीरचाही समावेश होतो. सियासत डॉट कॉमच्या अहवालानुसार, अभिनेता एका चित्रपटासाठी ३० ते ४० कोटी रुपये इतके मानधन घेतो. गेल्या १४ वर्षांपासून अभिनेता फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहे. त्याने आपल्या सिनेकरियरमध्ये, अनेक हिट चित्रपट चाहत्यांना दिले आहे.

Ranveer Singh Birthday
Chemotherapy And Hair Loss : कर्करोगग्रस्त रुग्ण का कापतात आपले केस? काय आहेत यामागची कारणे?

रणवीरने २०१० मध्ये ‘बँड बाजा बारात’ या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू केले. पहिल्याच चित्रपटाने रणवीरला एका रात्रीत प्रसिद्ध केलं. त्यानंतर अभिनेत्याने अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले आहे. आपल्या सिनेकरियरमध्ये रणवीरने कोट्यवधींची संपत्ती कमवली आहे. पण असं असलं तरीही सर्वाधिक संपत्तीही दीपिकाचीच आहे. सियासत डॉट कॉमच्या अहवालानुसार, रणवीरकडे ३६२ कोटींची संपत्ती आहे. तर दीपिकाकडे ५०० कोटींची संपत्ती आहे. दोघांची मिळून ८६० कोटींची संपत्ती आहे.

रणवीर जाहिरातींमधूनही चांगली कमाई करतो. मिळालेल्या माहितीनुसार ‘रॉकी आणि राणी की प्रेम कहाणी ठी रणवीरने २५ कोटी रुपयांची फी घेतली आहे. रणवीर सिंहला महागड्या गाड्यांची आवड आहे. त्याच्याकडे टोयोटा लँड क्रुझर, मर्सिडीज मॅबॅक GLS 600, Jaguar XLJ, मर्सिडिज बेंझ E Class, Lamborghini, Aston Martin Rapide S सारख्या कार त्याच्याकडे आहेत. रणवीरकडे स्वत:च्या मालकीचे अनेक घरं आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच रणवीरने शाहरूख खानच्या शेजारीच घर खरेदी केले होते. त्याची किंमत ११९ कोटी आहे.

Ranveer Singh Birthday
Rupali Bhosle New Home : "पत्र्याचं घर ते अलिशान फ्लॅट", रुपाली भोसलेने खरेदी केलं स्वप्नातलं घर; पोस्ट शेअर करत दाखवली नव्या घराची झलक

सोबतच अलिबागमध्ये २२ कोटींचा बंगला विकत घेतला होता. याशिवाय प्रभादेवीमध्ये आणि गोव्यातही अलिशान घर आहे. रणवीरने आजवर त्याच्या सिनेकरियरमध्ये, लव्हरच्या भूमिकेत, सिरीयस भूमिकेत, कधी खलनायकाच्या भूमिकेत, तर कधी कॉमिक भूमिका अशा वेगवेगळ्या भूमिका त्याने साकारल्या आहेत. लवकरच रणवीर अनेक सुपरहिट चित्रपटांच्या माध्यमातून तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Ranveer Singh Birthday
Anant- Radhika Music Ceremony : अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात रणवीर-सलमान बेधुंद होऊन नाचले, नवरदेवानेही धरला जबरदस्त ठेका

रणवीर शेवटचा 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केलेली होती. रणवीर सिंह लवकरच रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन' या कॉप युनिव्हर्स चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय तो 'डॉन ३'मध्येही दिसणार आहे.

Ranveer Singh Birthday
Anant- Radhika Merchant Wedding : अंबानी कुटुंबीयांनी संगीत सोहळ्यात केला भन्नाट डान्स; 'दिवानगी दिवानगी' गाण्यावर धरला जबरदस्त ठेका, पाहा VIDEO

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com