Rupali Bhosle New Home : "पत्र्याचं घर ते अलिशान फ्लॅट", रुपाली भोसलेने खरेदी केलं स्वप्नातलं घर; पोस्ट शेअर करत दाखवली नव्या घराची झलक

Rupali Bhosle Bought New Home : 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलेने मुंबईमध्ये नवं घर खरेदी केलं आहे. पत्र्याचं घर ते अलिशान घराचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केलेली आहे.
Rupali Bhosle Bought New Home News
Rupali Bhosle Bought New HomeSaam Tv

२०२४ या वर्षात अनेक सेलिब्रिटींनी अनेक नवं घर खरेदी करत आपलं स्वप्न पूर्ण केलं आहे. शिवाली परब, योगिता चव्हाण- सौरभ चौघुले, रोहित माने, शिव ठाकरे, आश्विनी कासर सह अनेक सेलिब्रिटींनी नवीन घर खरेदी केले. आता या यादीमध्ये 'आई कुठे काय करते' फेम रुपाली भोसलेचाही समावेश झाला आहे. अभिनेत्रीने मुंबईमध्ये नवं घर खरेदी केले आहे. पत्र्याचं घर ते अलिशान घराचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर अभिनेत्रीने एक पोस्ट शेअर केलेली आहे.

Rupali Bhosle Bought New Home News
Anant- Radhika Music Ceremony : अनंत-राधिकाच्या संगीत सोहळ्यात रणवीर-सलमान बेधुंद होऊन नाचले, नवरदेवानेही धरला जबरदस्त ठेका

रुपाली भोसले मराठी टीव्हीसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी एक आहे. इथवर पोहोचण्यासाठी अभिनेत्रीने खूप कष्ट केले आहे. 'डाऊन टू अर्थ' असणाऱ्या रुपालीने पोस्टमध्ये तिच्या संपूर्ण स्ट्रगलवर भाष्य केले आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये रुपाली भोसले म्हणाली, "ह्या जगाच्या पाठीवर कुठे का होईना आपलं स्वतः चं हक्काचं घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. स्वप्न बघायला पैसे लागत नाहीत असं म्हणतात पण एक वेळ अशी येते जेव्हा नियतीच तुमचं पाकीट मारते आणि हे स्वप्न बघायला सुद्धा तुमचं मन धजावत नाही. लहानपणी निसर्गचित्रातील त्रिकोणी व आयताकृती घर काढताना आपण ज्या स्टेप्स मध्ये घर काढतो त्या स्टेप्स मध्येच माझं घर पूर्ण होत गेलं फक्त त्या वेगवेगळ्या स्टेप्स म्हणजे माझ्या आयुष्यातली वेगवेगळी घरं होती."

"कोऱ्या कागदावर काहीच न काढलेली स्टेप सुद्धा माझ्यासाठी एका वेळेसचं घर होतं कारण तेव्हा आम्ही अक्षरशः रस्त्यावर राहायचो. आयुष्यातलं ते पान नवीन आणि कोरं होतं पण पेन्सिलीने चित्र काढण्याची धमक शाबूत होती. त्यानंतर चित्र काढताना आधी आपण केवळ आयताकृती भिंती काढतो, ते सुद्धा एका टप्प्यावरचं माझं घर होतं कारण तेव्हा आम्ही सगळे गोठ्यात रहात होतो. केवळ भिंती...छप्पर असं काहीच नव्हतं…हां शेणाने सारवलेलं अंगण मात्र तेव्हा होतं आमच्याकडे मग पुढे चित्रामध्ये त्रिकोणी, कौलारू छत काढलं आणि आम्हाला पत्र्याचं का होईना घर मिळालं...आयुष्य इतक्या ठिकाणी उसवलेलं की त्यापुढे त्या पत्र्यांना असलेल्या भोकांचं ऐवढं काही वाटायचं नाही...फक्त कोणी त्यातून आपल्याला बघू नये म्हणून पहाटे साडेतीन ला उठून आंघोळ करावी लागायची."

Rupali Bhosle Bought New Home News
Anant- Radhika Merchant Wedding : अंबानी कुटुंबीयांनी संगीत सोहळ्यात केला भन्नाट डान्स; 'दिवानगी दिवानगी' गाण्यावर धरला जबरदस्त ठेका, पाहा VIDEO

"पुढे परिस्थिती थोडी बरी झाल्यावर भाड्याची सतराशे साठ घरं बदलली... त्या सगळ्या प्रवासात अनेकदा ह्या चित्र असलेल्या कागदाचा चोळामोळा करून, फाडून फेकून द्यावा वाटला. स्वतःचं घर असावं हे स्वप्नच चुकीचं आहे असं वाटायला लागलं...पण स्वप्न दाखवणा ऱ्याला खचून चालत नाही कारण त्याच्याकडे बघणारे अनेक जण असतात. त्यामुळे मान खाली घालून अथक मेहनत करत राहण्याशिवाय दुसरा कुठलाच पर्याय त्याच्याकडे नसतो. मागची अनेक वर्षे काम करत खाली घातलेली मान मी जेव्हा काही दिवसांपूर्वी वर उंचावून पाहिली आणि लक्षात आलं... अरेच्चा चित्र पूर्ण झालं की आपलं..."

Rupali Bhosle Bought New Home News
Malik Film : '१२ वी फेल' फेम मेधा शंकर दिसणार ॲक्शनपटात; राजकुमार रावसोबत करणार एकत्र स्क्रीन शेअर

"परमेश्वराचे, आईवडीलांनचे आशीर्वाद, असंख्य मित्र मैत्रिणी व फॅन्स च्या सदिच्छा यांमुळे मी नवीन घरात आई, बाबा आणि संकेत सोबत प्रवेश करत आहे. तुम्ही आजवर दाखवत आलेल्या प्रेमामुळेच हे शक्य झाले आहे. मनापासून धन्यवाद!!! आणि आता वेळ आहे पूर्ण झालेल्या चित्रामध्ये मनसोक्त रंग भरण्याची.. मग ते रंग सांडून बॉर्डरच्या, कागदाच्या बाहेर गेले तरी किसको है फिकर..."

Rupali Bhosle Bought New Home News
Mirzapur 3 Online Leaked : 'मिर्झापूर ३' सीरीजचे सर्व एपिसोड ऑनलाईन लीक, निर्मात्यांना मोठा झटका

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com