Bigg Boss Marathi SAAM TV
मनोरंजन बातम्या

Bigg Boss Marathi : "मी कुचकी..." व्हिडीओ पाहून तुम्हीच म्हणालं निक्कीला नेमकं झाल तरी काय?

Nikki Tamboli : बिग बॉस मराठीचा हा शेवटचा आठवडा सुरू आहे. आता निक्की घरात एकटीच बोलताना पाहायला मिळत आहे. ती नेमकं काय बोलत आहे जाणून घ्या.

Shreya Maskar

'बिग बॉस मराठी 5' (Bigg Boss Marathi) पर्व खूप गाजत आहे. सर्वत्र या पर्वाची चर्चा होताना पाहायला मिळत आहे. आता घरात सात स्पर्धक उरले आहेत. वर्षा ताई, निक्की, जान्हवी, सूरज, धनंजय दादा, अभिजीत आणि अंकिता या स्पर्धकांपैकी कोण बिग बॉसची ट्रॉफी उचलणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून आहे.

निक्कीने हे संपूर्ण पर्व गाजवल आहे. तिने आपल्या गेमने प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. निक्की आणि अरबाजच्या जोडीनं बिग बॉस मराठीच्या घरात धुमाकूळ घातला आहे. निक्की (Nikki Tamboli) पहिल्या दिवसापासून घरातील अनेक सदस्यांशी भांडताना पाहायला मिळत आहे. मात्र निक्कीला 'तिकीट टू फिनाले' मिळाले आहे. बिग बॉसच्या घरातील ती पहिली सदस्य आहे जी फिनालेला पोहचली आहे. नुकताच घरात ग्रँड सेलिब्रेशन पार पडल आहे. त्यानंतर निक्की घरात स्वतः च्या वागण्याविषयी बोलताना दिसत आहे.

'बिग बॉस मराठी'चा नवीन एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात निक्की स्वतःशी संवाद साधत आहे. तुम्ही पाहू शकता की निक्की एकटीच बोलत आहे की, "कपटीपणा एक असतो, नालायकपणा एक असतो, कुचकट या सर्व क्लालिटी नाही आहेत माझ्यात. मी नाही आहे अशी. हार्टपासून माझ्या हृदयापासून मी खूप प्युअर आहे. हो मी मानते की, मी खूप चुकीची वागली आहे. या घरात लोकांची मन दुखावलीत मी. पण मला ही तेवढाच त्रास झाला आहे. "

'बिग बॉस मराठी 5' ग्रँड फिनाले 6 ऑक्टोबरला पार पडणार आहे. 'बिग बॉस मराठी' या पर्वाचा विजेता कोण होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. तसेच आता बिग बॉसच्या घरातील कोण बाहेर जाणार आणि कोणाला 'तिकीट टू फिनाले' मिळणार हे जाणून घेणे मनोरंजक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Scenic Train Journey: भारताच्या या ८ रेल्वेतून प्रवास करा अन् स्वर्गसुखाचा आनंद लुटा

Pune Ganeshotsav: विसर्जन मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी 'डीजे'ला परवानगीची गरज नाही, पोलिस आयुक्त काय म्हणाले?

Maharashtra Live News Update : केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक संपली

Cabinet Decisions : मंत्रिमंडळाच्या बैठकीत ८ मोठे निर्णय; १० जिल्ह्यात 'उमेद मॉल' अन् बरेच काही

Nashik : कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; अधिकारी न भेटल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कांदे फेकून आंदोलन

SCROLL FOR NEXT