बाप्पाचा आशीर्वाद आणि हृदय प्रत्यारोपण, तरूणाला मिळालं नवजीवन; १७ वर्षीय ब्रेनडेड तरूणामुळे ४ जणांना नवं आयुष्य!

Heart Transplant: मुंबईत एका १७ वर्षीय ब्रेनडेड तरूणामुळे या २१ वर्षीय तरूणाला जीवनदान मिळालं आहे. या तरूणामुळे एकूण ४ जणांचे प्राण वाचण्यास मदत झाली आहे.
Heart Transplant
Heart Transplantsaam tv
Published On

मुंबईत एकीकडे गणेश चतुर्थीची धुमाकूळ सुरु असताना मुंबईमध्ये एका २१ वर्षीय तरूणाला नव्याने जीवन मिळालं आहे. मुलुंडच्या फोर्टिस रूग्णालयामध्ये या २१ वर्षीय व्यक्तीवर हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. सहा महिन्यांपूर्वी प्रतिक्षा यादीमध्ये नाव नोंदवल्यानंतर एका १७ वर्षीय ब्रेनडेड तरूणामुळे या २१ वर्षीय तरूणाला जीवनदान मिळालं आहे.

तब्बल एका वर्षापूर्वी या २१ वर्षांच्या व्यक्तीला Restrictive Cardiomyopathy या हृदयाच्या आजाराचं निदान झालं होतं. हृदयाच्या या आजारामुळे हृदय कमजोर होऊ लागतं. या समस्येमध्ये रूग्णाला श्वास घेण्यास गंभीर त्रास होऊ लागला होता. शिवाय चालणं देखील त्याच्यासाठी कठीण झालं होतं. गेले काही दिवस तो रूग्ण अंथरूणाला खिळून होता.

Heart Transplant
Postpone Periods Dates: सणासुदीला पुजेनिमित्त मासिक पाळी पुढे ढकलण्याच्या गोळ्या घेताय? प्रजनन क्षमतेवरही होतोय परिणाम

अशातच 17 वर्षांच्या तरूणाचा रस्ते अपघात झाला आणि त्या तरुणाच्या कुटुंबाने अवयवदानासाठी दिलेली परवानगी एक चमत्कार ठरला. यावेळी नवी मुंबईमधील एका रूग्णालयात या ब्रेनडेड रूग्णाचं अवयवदान करण्यात आलं. त्यानंतर नवी मुंबई ते फोर्टिस हॉस्पिटल, मुलुंड अशा ग्रीन कॉरिडॉरने अवघ्या ३२ मिनिटांमध्ये हृदय पोहोचवण्यात आलं.

प्रत्यारोपणातील आव्हानांबद्दल सांगताना फोर्टीस रूग्णालयातील वरिष्ठ सल्लागार - बालरोग कार्डिओथोरॅसिक सर्जरी डॉ. धनंजय मालणकर म्हणाले, “या रूग्णासाठी नवीन हृदयाच्या प्रतिक्षेत होतो. रूग्णाला असलेल्या आजाराची परिस्थिती हाताळण्यासाठी आम्हाला अनेक औषधं द्यावी लागली. सध्या हृदय प्रत्यारोपण झालं असून रूग्ण आमच्या देखरेखीखाली आहे.”

या १७ वर्षीय तरूणाच्या वडिलांनी हृदयासोबत लिव्हर आणि किडनी देखील दान करण्याचा निर्णय घेतला. यामुळे एकूण ४ जणांचे प्राण वाचले. झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिनेशन सेंटरच्या माहितीनुसार, इतर अवयव बाकी रूग्णालयात दान केले गेलेत. यंदाच्या वर्षीचं हे ४१ वं अवयव दान होतं.

Heart Transplant
Cancer Risk: तुमच्या घरातील भांडी घासण्याचा साबण तुम्हाला पाडतोय आजारी; 'या' चुकीमुळे वाढतो कॅन्सरचा धोका

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com