Nikki Tamboli 
मनोरंजन बातम्या

Nikki Tamboli: बिग बॉस फेम निक्की तांबोळीची झाली फसवणूक; चाहते आणि घरच्यांना दिला सावध राहण्याचा इशारा

Nikki Tamboli: टीव्ही अभिनेत्री निक्की तांबोळी बिग बॉसमुळे प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. सध्या ती 'द ५०' या शोमध्ये काम करत आहे. दरम्यान, अभिनेत्रीने तिच्या जवळच्या मित्रांना आणि चाहत्यांना सावध राहण्याचा ईशारा दिला आहे.

Shruti Vilas Kadam

Nikki Tamboli: बिग बॉस फेम निक्की तांबोळी यांनी इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये चाहते, जवळचे मित्र आणि काही लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. तिने स्पष्ट केले की कोणीतरी तिच्या नावाचा वापर करून लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे. तिने सोशल मीडियावर या व्यक्तीबद्दल माहिती देखील शेअर केली आहे. निक्कीने तिच्या पोस्टमधून लोकांना सावध केले.

निक्की तांबोळीच्या नावाने स्कॅम

इंस्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये निक्कीने एक नंबर आणि एक चॅट शेअर केला आहे. यामध्ये एक अज्ञात नंबर तिच्या जवळच्या लोकांशी संपर्क साधत आहे. पोस्टसोबत निक्कीने लिहिले आहे की, "कोणीतरी बनावट नंबरवरून लोकांना मेसेज करण्यासाठी माझे नाव आणि फोटो वापरत आहे. ही मी नाही. कृपया या व्यक्तीकडे दुर्लक्ष करा. उत्तर देऊ नका. हे स्कॅम असू शकते." कृपया या नंबरची तक्रार करा आणि ब्लॉक करा.

चॅट्समध्ये काय लिहीले होते

निक्कीने शेअर केलेल्या चॅटमध्ये लिहिले, हेय अमित कसा आहेस? मी ठीक आहे आणि तु, नेहमीच मस्त, छान. हा तुझा नवीन नंबर आहे का? हो सेव्ह करा, आशा आहे की तुला आपले शूट आठवत असेल, मला सुंदर दाखवण्यासाठी थँक्यू.

निक्की तांबोळी "द ५०" या रिअॅलिटी शोमध्ये

निक्की तांबोळी आणि तिचा बॉयफ्रेंड अरबाज पटेल यांनी नुकत्याच सुरू झालेल्या 'द ५०' या रिअॅलिटी शोमध्ये आहे. हे दोघे बऱ्याच काळापासून डेट करत आहेत. अरबाज पटेल शेवटचा 'राईज अँड फॉल' या शोमध्ये दिसला होता. तर, निक्की शेवटचा 'सेलिब्रिटी मास्टर शेफट या शोमध्ये दिसली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Deepali Sayyad: 'कितीही धमक्या येऊ द्या....'; भोंदू अशोक खरातवरील चित्रपटाबाबत अभिनेत्री दीपाली सय्यदची ठाम भूमिका

Maharashtra News Live Update: नीट पेपरफुटी प्रकरणी सर्वात मोठी अपडेट, मनीषा हवलदार आणि तेजस शहा यांच्या मधला दुवा सापडला?

राज्यात घराणेशाहीची दुसरी इनिंग, मुलांच्या आमदारकीसाठी नेत्यांचं लॉबिंग, नेत्यांच्या मुलांसाठी निष्ठावंतांना डावलणार?

पुण्यात विषारी दारुचे 14 बळी, पुणे पोलीस करतायत तरी काय, संतप्त नागरिकांनी दारूचा अड्डा केला उद्ध्वस्त!

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे ॲक्शन मोडमध्ये! राज्यभर आयुर्वेदीक केंद्रांवर FDA ची कारवाई; नामांकित कंपनीचा औषधसाठा जप्त

SCROLL FOR NEXT