Actor Death: प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्याआड; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, मनोरंजन विश्वावर शोककळा

Actor Death: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता जेम्स व्हॅन डेर बीक यांचे दु:खद निधन झाले आहे. त्यांच्या कुटुंबीयांनी सोशल मीडिया पोस्टवर करुन त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे.
hollywood actor James Van Der Beek passes away
hollywood actor James Van Der Beek passes awaySaam Tv
Published On

Actor Death: हॉलिवूड अभिनेता जेम्स व्हॅन डेर बीक यांचे कर्करोगाने निधन झाले. त्यांच्या आजाराची माहिती मिळताच त्यांनी कर्करोग जागरूकता निर्माण करण्यासाठी काम सुरू केले होते. गुरुवारी त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर त्यांच्या मृत्यूची माहिती देण्यात आली. जेम्स व्हॅन डेर बीक यांचे चाहते आणि हॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर अभिनेत्याला श्रद्धांजली वाहत आहेत.

कुटुंबाने पोस्ट शेअर केली

कुटुंबाच्या व्यक्तींनी हॉलिवूड अभिनेता जेम्स व्हॅन डेर बीक यांच्या इंस्टाग्राम पेजवर त्यांच्या मृत्यूची बातमी शेअर केली. त्यात त्यांनी लिहिले की, "आमचा प्रिय जेम्स व्हॅन डेर बीक यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांनी त्यांच्या शेवटच्या काळात धैर्य आणि विश्वासाने काम केले. त्यांच्याबद्दल सांगण्यासारखे बरेच काही आहे. सध्या तरी, आम्हाला आमचे प्रिय पती, वडील, मुलगा, भाऊ आणि मित्राच्या निधनाने दुःख झाले आहे. या दुःखद काळात आम्ही गोपनीयतेची विनंती करतो."

hollywood actor James Van Der Beek passes away
Ranveer Singh Receives Threat: रोहित शेट्टीनंतर रणवीर सिंगला मिळाली जीवे मारण्याची धमकी; बॉलिवूडमध्ये भीतीचं वातावरण

मित्र आणि चाहते

हॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी आणि चाहते सोशल मीडियावर जेम्स व्हॅन डेर बीक यांना श्रद्धांजली वाहत आहेत.जेम्सने त्याच्या शेवटच्या काळातही कर्करोग जागरूकता निर्माण करण्यासाठी काम केले आणि अनेकांचे जीव वाचवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

hollywood actor James Van Der Beek passes away
Actor Arrested: प्रसिद्ध अभिनेता निघाला चोर; बहिणीच्या लग्नासाठी केली चोरी, असा अडकला पोलिसांच्या जाळ्यात

जेम्सने केलेले काम

जेम्स व्हॅन डेर बीक हिट अमेरिकन ड्रामा 'डॉसन क्रीक' मध्ये डॉसन लीरीची भूमिका साकारून प्रसिद्धी मिळवली. जेम्सच्या सर्वात लोकप्रिय चित्रपटांमध्ये 'वर्सिटी ब्लूज' (१९९८), 'टेक्सास रेंजर्स' (२००१), 'द रुल्स ऑफ अट्रॅक्शन' (२००२), 'फॉर्मोसा बेट्रेड' (२००९), 'लेबर डे' (२०१३) आणि 'बॅड हेअर' (२०२०) यांचा समावेश आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com