Nana Patekar SAAM TV
मनोरंजन बातम्या

Nana Patekar : ऑम्लेट पलटताना तुटतं? वापरा नाना पाटेकरांची युनिक ट्रिक, पाहा VIDEO

Nana Patekar Cooking Video : नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत नाना पाटेकर यांनी ऑम्लेट पलटण्याची सिंपल ट्रिक दाखवली आहे.

Shreya Maskar

नाना पाटेकर (Nana Patekar) कायम आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखले जातात. त्यांनी आजवर मराठी आणि हिंदी चित्रपटात तसेच वेब सीरिजमध्ये काम केले आहे. त्यांच्या चित्रपटातील डायलॉगही खूप लोकप्रिय आहेत. नाना पाटेकर त्यांच्या स्पष्टवक्तपणामुळे कायमच चर्चेत राहीले आहेत. सध्या ते एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये नानांचे यात पाक कौशल्य पाहायला मिळत आहे.

अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी नाना पाटेकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर यांनी स्वत: ऑम्लेट बनवून आशिष विद्यार्थी यांना खाऊ घातले आहे. या व्हिडीओमध्ये नाना पाटेकर यांनी ऑम्लेट उलटण्याची एक युनिक ट्रिक सांगितली आहे.आशिष विद्यार्थी यांनी या व्हिडीओला एक खास कॅप्शनं दिलं आहे. त्यांनी लिहिलं की, "नाना तुम्ही घेतलेल्या काळजी आणि प्रेमाने मी भारावून गेलो... तुम्हाला खूप प्रेम..."

नानांची ऑम्लेट पलटण्याची युनिक ट्रिक

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नानांनी पॅनमधील ऑम्लेट उलट्या ताटावर काढले आणि पुन्हा ताटाच्या मदतीने ते पलटून दुसरी बाजू शिजण्यासाठी पॅनमध्ये टाकले.

आशिष विद्यार्थी यांनी देखील नानांनी बनवलेल्या ऑम्लेटचे कौतुक करून ऑम्लेट खाल्यानंतर आनंद व्यक्त केला आहे. नाना पाटेकर यांच्या या व्हिडीओवर चाहते आणि कलाकारांकडून देखील कमेंट्सचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे. आशिष विद्यार्थी आणि नाना पाटेकर यांनी 'द कन्फेशन' आणि 'भीमा' या चित्रपटात एकत्र काम केले आहे.अलिकडेच प्रेक्षकांच्या भेटीला आलेला नाना पाटेकर यांचा 'वनवास' चित्रपट आता ओटीटीवर पाहता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्त्यांची इच्छा - नितेश राणे

Masala Gobi Recipe : कोबीच्या भाजीला द्या खास ट्विस्ट, मुलं ५ मिनिटांत फस्त करतील टिफिन

Salman Khan : "वारंवार चुका करणे ही सवय बनते...", सलमान खाननं केली रात्री १२ वाजता पोस्ट

Pune Rave Party: रेव्ह पार्टी प्रकरणात नवं कनेक्शन समोर, क्रिकेट बुकीला बेड्या; खडसेंच्या जावयाकडून पार्टीचं आयोजन

राज ठाकरे मातोश्रीवर घेणार उद्धव ठाकरेंची भेट, निमित्त वाढदिवसाचे, चर्चा युतीची?

SCROLL FOR NEXT