Mukta Barve On Marriage Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mukta Barve: '...त्याच्याशीच मी लग्न करेन'; मुक्ता बर्वेची मिस्टर परफेक्टसाठी स्पेशल अट

Mukta Barve On Marriage: मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे मुक्ता बर्वे. मुक्ता ही नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मुक्ता नुकतीच 'नाच गं घुमा' या चित्रपटात दिसली होती.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे मुक्ता बर्वे. मुक्ता ही नेहमीच वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. मुक्ता नुकतीच 'नाच गं घुमा' या चित्रपटात दिसली होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे. मुक्ता ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते. मुक्ताने वयाची चाळीशी ओलांडली तरी लग्न केले नाही. त्यामुळे तिला सोशल मीडियावर अनेक प्रश्न विचारण्यात आले आहे. नुकत्याच एका मुलाखतीत मुक्ताने लग्नासाठी तिची एक अट असल्याचे सांगितले आहे.

मुक्ता बर्वेचा मोठा चाहतावर्ग आहे. मुक्ताच्या लग्नाबाबत तिच्या चाहत्यांना अनेक प्रश्न पडलेले असतात. मुक्ता बर्वेने वयाची ४५ वर्षे ओलांडली तरी लग्न का केले नाही, असा प्रश्न तिला अनेकवेळा विचारण्यात आला आहे. लग्नासाठी तिला कसा मुलगा आहे, तिच्या अपेक्षा काय आहेत, असंही तिला अनेक मुलाखतीत विचारण्यात आले आहेत. मुक्ताने नुकत्यात एका मुलाखतीत याचा खुलासा केला आहे. मुक्ताने तिची लग्नासाठी असलेली अट सांगितली आहे.

'आता मी जितकी आनंदी आहे, सुखी आहे. त्यापेक्षा जास्त आनंद देणारा आणि सुख वाढवणारा कुणी मुलगा असेल तर मी नक्की लग्न करेन', असं मुक्ताने सांगितले आहे. मुक्ताची तिच्या नवऱ्यासाठी ही अट आहे. त्यामुळे मुक्ताला असा लाईफ पार्टनर कधी भेटणार, याकडे चाहत्यांचे विशेष लक्ष आहे.

मुक्ता बर्वेच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती नुकतीच 'नाच गं घुमा' चित्रपटात झळकली होती. चित्रपटातील मुक्ताची अॅक्टिंग सर्वांनाच आवडली आहे. याचसोबत मुक्ता चारचौघी या नाटकाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत आहे. या नाटकाचे देश विदेशात प्रयोग सुरु आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi bhasha Vijay Live Updates : तुमच्याकडे न्याय मिळत नसेल तर गुंडगिरी करू, ठाकरेंचा फडणवीसांना टोला

Garja Maharashtra Maza : ठाकरेंच्या मेळाव्याची गर्जा महाराष्ट्र गीताने सुरूवात | VIDEO

Rava Puri Recipe : टिफीनमध्ये रोज चपाती कशाला? झटपट करा कुरकुरीत बटाटा पुरीचा नाश्ता

विजयी मेळाव्याला या मराठी कलाकारांची हजेरी, Photo पाहा

Marathi Vijay Melava: संपूर्ण लाईट बंद... इकडून उद्धव, तिकडून राज, ठाकरे बंधूंची ग्रँड एंट्रीने वरळी डोम दणाणला|VIDEO

SCROLL FOR NEXT