Paru And Aditya Wedding : 'पारू'च्या नव्या प्रोमोने वेधलं लक्ष, पारू आणि आदित्यचं लग्न होणार पण...

Paru Serial : झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'पारू' ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अशातच मालिकेत आता पारू आणि आदित्यच्या लग्नाचा मोठा ट्वीस्ट येणार आहे.
Paru Serial : 'पारू'च्या नव्या प्रोमोने वेधलं लक्ष, पारू आणि आदित्यचं लग्न होणार पण...
Paru SerialSaam Tv

झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'पारू' ची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ही मालिका सध्या टीआरपी चार्टमध्ये टॉप १५ मध्ये आहे. मालिकेत गेल्या काही दिवसंपासून ट्विस्ट पाहायला मिळत आहे. मालिकेत नुकतेच सुर्यकांत कदम (भरत जाधव) यांची एन्ट्री झाली आहे. ते आद्दित्यच्या कुटुंबीयांना त्रास देताना पाहायला मिळत आहे. दरम्यान मालिकेचा नवा प्रोमो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.

Paru Serial : 'पारू'च्या नव्या प्रोमोने वेधलं लक्ष, पारू आणि आदित्यचं लग्न होणार पण...
Actor Chandrakanth Dies : जवळच्या मैत्रिणीचा कार अपघातात मृत्यू, नैराश्यात बुडालेल्या अभिनेत्याने संपवलं जीवन

पारू नावाच्या ह्या अल्लड मुलीने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे. आता लवकरच मालिकेत एक नवा ट्वीस्ट येणार आहे. मालिकेच्या नव्या प्रोमोत आदित्य आणि पारूचं लग्न होताना दिसत आहे. पारू नवरीच्या वेशात तर आदित्य नवरदेवाच्या लूकमध्ये दिसत आहे. पारू नवरीच्या वेशात तयार होताना दिसत आहे. त्यानंतर ती लग्न मंडपात एन्ट्री घेताना दिसत आहे. त्यानंतर दोघांचंही लग्न होतं. दोघेही खूप खुश दिसत आहेत. पण पारूचा हा आनंद फार काळ टिकत नाही.

लग्न लागल्यावर आदित्य म्हणतो, कसं झाला शूट. त्यानंतर पारूला समजत की, हे खोटं लग्न होतं. फक्त शूटिंगसाठी ह्या दोघांनी लग्न केले होतं. प्रॉडक्शन टीम पेरूचे सगळे दागिने काढून नेते पण मारू मंगळसूत्र देणार नाही असा निर्धार करते आणि हे लग्न खरं असल्याचं मानते असं प्रोमोमध्ये दाखवण्यात आलंय. पारुला मात्र खूप वाईट वाटलेल दिसत आहे. मालिकेचे पुढील एपिसोड खूपच रंजक असणार, हे नक्की...

Paru Serial : 'पारू'च्या नव्या प्रोमोने वेधलं लक्ष, पारू आणि आदित्यचं लग्न होणार पण...
Ashvini Mahangade: "बापमाणूस मिळायला भाग्य लागतं...."; अश्विनी महांगडे वडिलांच्या आठवणीत भावूक

मालिकेमध्ये येणारा नवा ट्वीस्ट नेमका काय असणार ? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला २७ मे पासून संध्याकाळी ७:३० वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. मालिकेचा हा प्रोमो निर्मात्यांनी शेअर केल्यानंतर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहे. पारूसोबत असं व्हायला नको, आदित्य आणि पारूचं खरोखर लग्न लावून द्या, अशी मागणी केलीये. तर एकाने थेट कथानकातच बदल करा असं सांगितला.

Paru Serial : 'पारू'च्या नव्या प्रोमोने वेधलं लक्ष, पारू आणि आदित्यचं लग्न होणार पण...
Tiger Shroff : टायगर श्रॉफला मोठा झटका, 'बडे मियाँ छोटे मियाँ' फ्लॉप झाल्यानंतर निर्मात्यांकडून फीसमध्ये कपात

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com