Akshay Kumar Saam Tv
मनोरंजन बातम्या

Mumbai News: अरे बापरे रे! "या' सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरने खरेदी केलं अक्षय कुमारचं कोट्यवधींचं घर

Rohini Gudaghe

Chandni Bhabhda Buys Akshay Kumars Flat

अभिनेता अक्षय कुमारचं घर (Akshay Kumars Flat) खरेदी करणाऱ्या सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरचं नाव चांदनी भाभडा आहे. सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर चांदनी भाभडा हिने अक्षय कुमारचा ६ कोटींचा फ्लॅट खरेदी केला आहे. ती लवकरच तिच्या अपार्टमेंटच्या इंटीरियरची झलक शेअर करणार आहे. ती तिच्या या नव्या घराला राजस्थानी आणि बॉलवूड टच देणार आहे.  (latest marathi news)

लोकप्रिय सोशल मीडिया एन्फ्लुएन्सर चांदनी भाभडाने आपलं ड्रिम हाऊस खरेदी केलं (Social Media Influencer) आहे. तिने अंधेरी (Mumbai) येथे तिचं पहिलं स्वप्नातील घर खरेदी केल्याचं सांगितलं आहे. हे घर अभिनेता अक्षय कुमारचं होतं! चांदनीने हा फ्लॅट सुमारे ६ कोटी रुपयांना खरेदी केल्याचं वृत्त आहे. रविवारी तिने शहरातील मुंबा देवी मंदिरात प्रार्थना करतानाचे फोटो शेअर केले होते

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अपार्टमेंटच्या इंटिरिअरची झलक

चांदनी भाभडा (Social Media Influencer Chandni Bhabhda) ही २४ वर्षाची आहे. ती तिच्या उत्कृष्ट मिमिक्री कौशल्यासाठी आणि अभिनयासाठी ओळखली जाते. तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ही रोमांचक बातमी शेअर केली. तिच्या हाऊस-वॉर्मिंग समारंभाची छायाचित्रे पोस्ट करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, माझं संपूर्ण कुटुंब खूप आनंदी आहे. त्यांना माझा खूप अभिमान आहे.

तिने नव घर खरेदी केल्यानंतर तिच्या चाहत्यांनी तिचं कौतुक (Chandni Bhabhda Buys Akshay Kumars Flat) केलं आहे. त्यांनी नवीन घराबद्दल चांदनीचं अभिनंदन देखील केलं आहे. चांदनीने सांगितलं आहे की, ती लवकरच तिच्या अपार्टमेंटच्या इंटिरिअरची झलक शेअर करणार आहे. नव्या घराला ती राजस्थानी आणि बॉलवुड टच देणार आहे.

अक्षय कुमारचं घर खरेदी केलं

चांदनी भाभडाचे ( Chandni Bhabhda) 4.6 लाखांहून जास्त फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर ती चांगली सक्रिय असते. घर विकत घेण्यासाठी पैसे वाचवण्यासाठी तिला काय काय करावं लागलं, हे देखील तिने शेअर केलं आहे. नवीन घराच्या सजावटीसाठी ती राजस्थान, IKEA स्टोअर्स आणि क्रॉफर्ड मार्केटमध्ये वस्तू खरेदी करणार असल्याचं तिनं सांगितलं आहे.

24 वर्षाच्या या सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरने अक्षय कुमारचं घर खरेदी केलं (Social Media Influencer Buys Akshay Kumars Flat) आहे. त्यामुळे चांदनी आणि तिचे कुटुंब आनंदात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND W vs PAK W: भारताच्या रणरागिणी पाकिस्तानवर पडल्या भारी! हरमनप्रीत शेवटपर्यंत लढली

Mumbai Accident: पश्चिम द्रुतगती महामार्गावर टेम्पोचा भीषण अपघात, गोरेगाव ते मालाड दरम्यान वाहतूक कोंडी

Marathi News Live Updates : जयंत पाटलांनी पैसे वाटल्याचे आरोप सिद्ध करावेत, दीपक केसरकरांचं खुलं आव्हान

VIDEO : स्मारकाच्या शोधत राजे; महाराजांच्या नावाने खेळ करू नका, संभाजीराजेंनी दिला इशारा

Jayant Patil : पटेलांच्या पुतळ्यापेक्षा कोणताही पुतळा उंच असू नये, हे ठरवलंय ; जयंत पाटलांचा भाजपवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT