Badshah On Mrunal Thakur Instagram
मनोरंजन बातम्या

Badshah On Mrunal Thakur: मृणाल ठाकूर आणि बादशाह खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत का?, रॅपरने सांगितलं ‘त्या’ व्हायरल फोटोमागील सत्य

Mrunal Thakur News: शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती.

Chetan Bodke

Badshah On Mrunal Thakur

बॉलिवूड आणि टॉलिवूड अभिनेत्री मृणाल ठाकूरने आपल्या फॅशनमुळे नावलौकिक मिळवले आहे. मृणाल ठाकूर कायमच सोशल मीडियावर हटक्या अंदाजातील फोटोंमुळे चर्चेत राहते. आपल्या अभिनयाच्या माध्यमातून अभिनेत्रीने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कायमच अभिनयामुळे आणि फॅशनमुळे चर्चेत राहणारी मृणाल ठाकूर सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

नुकतंच शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीला अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. पण या सर्वात चर्चा झाली ती मृणाल ठाकूर रॅपर बादशाहची. सध्या सोशल मीडियावर त्यांच्या बॉंडिंगची जोरदार चर्चा होत आहे. या पार्टीतला मृणाल आणि रॅपर बादशाहचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

त्या व्हिडीओची सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा होत आहे. नुकतंच मृणालने इन्स्टाग्राम स्टोरीवर बादशाहसोबतचे काही फोटो शेअर केले होते. तिने शेअर केलेले फोटो शिल्पा शेट्टीच्या दिवाळी पार्टीतले होते. त्या फोटोंवर बादशाहने प्रतिक्रिया दिली. (Bollywood)

ते फोटो पाहून अनेकांनी दोघांचेही नाव जोडले आहेत. नुकतंच इन्स्टा स्टोरीच्या माध्यमातून प्रसिद्ध रॅपर बादशाहने अफवांवर प्रतिक्रिया दिली आहे. “प्रिय इंटरनेट, तुम्हाला पुन्हा एकदा निराश केल्याबद्दल क्षमस्व, पण तुम्ही जे विचार करत आहात ते तसे नाही.” अशी बादशाहने इन्स्टा स्टोरी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. पण या अफवांवर मृणालने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. (Bollywood Actor)

Badshah Story

डेटिंगच्या चर्चांदरम्यान रॅपर बादशाहने इन्स्टाग्रामवर आणखी एक स्टोरी शेअर केली आहे. “तर समजण्याचा प्रयत्न करा, एक नाणं फेकलं आहे.”, असं बादशाह आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर बोलला आहे मृणाल सोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर बादशाहने प्रतिक्रिया देऊन त्याने पुन्हा एकदा सोशल मीडियावर खळबळ उडवून दिली आहे. अनेकांना त्याच्या ह्या स्टोरीचा अर्थ लागत नाही. (Bollywood Actress)

Badshah Story

मृणाल ठाकूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, नुकताच ॲमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित झालेल्या ‘पिप्पा’मध्ये ती मुख्य भूमिकेत दिसली होती. चित्रपट १० नोव्हेंबरला ओटीटीवर रिलीज झाला आहे. चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत मृणाल ठाकूर व्यतिरिक्त इशान खट्टर, प्रियांशू पैन्युली, सोनी राजदान यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. पिप्पा चित्रपटाचे सध्या सर्वत्र जोरदार कौतुक केले जात आहे. (Entertainment News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: महाविकास आघाडीला मोठं खिंडार, अनेक बडे नेते, संरपंचांसह पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Asim Sarode On Atharva Sudame: अथर्व सुदामेसाठी असीम सरोदे मैदानात, थेट राज ठाकरेंना लावला फोन| पाहा व्हिडिओ

Pune Traffic: गणेशोत्सवाच्या काळात वाहतुकीत मोठे बदल; शहरातील मध्यवर्ती भागात जड वाहतूक बंद

Indian Festivals: दसऱ्यापासून ते दिवाळीपर्यंत; वाचा मुहूर्त, वार आणि तारीखसह सणांची यादी

Maharashtra Politics: निवडणुकीआधीच महायुतीत संघर्ष? शिंदेंच्या खात्यावर फडणवीस नाराज?

SCROLL FOR NEXT