Papa Meri Jaan Song
Papa Meri Jaan SongSaam Tv

Animal Papa Meri Jaan Song: 'ॲनिमल' मधील 'पापा मेरी जान' गाणं रिलीज, वडील आणि मुलाचं प्रेम पाहून इमोशनल झाले चाहते

Animal Movie New Song Out: 2 मिनिटे 57 सेकंदाच्या या चित्रपटात रणबीरचे वडिलांसोबतचे बॉन्डिंग दाखवण्यात आले आहे.
Published on

Animal Movie:

बॉलिवूड (Bollywood) अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) यांच्या आगामी ‘ॲनिमल’ चित्रपटाची (Animal Movie) प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटामुळे रणबीर कपूर चर्चेत आहे. या चित्रपटाचे पोस्टर, ट्रेलर, टीझर आणि दोन गाणी रिलीज झाल्यानंतर आता या चित्रपटातील तिसरं गाणं 'पापा मेरी जान' रिलीज झाले आहे.

2 मिनिटे 57 सेकंदाच्या या चित्रपटात रणबीरचे वडिलांसोबतचे बॉन्डिंग दाखवण्यात आले आहे. अनिल कपूर हे कामात इतके व्यस्त आहेत की त्यांच्याकडे आपल्या मुलासाठी वेळ नसल्याचेही दिसून आले आहे. या गाण्यात रणबीर कपूरच्या लहानपणापासून ते मोठ्या होण्यापर्यंतच्या क्लिप दाखवण्यात आल्या आहेत. हे भावनिक गाणे प्रेक्षकांच्या मनाला भिडणारे आहे.

सोनू निगमने हे गाणं गायलं आहे. हे गाणं हिंदी व्यतिरिक्त तेलुगू, तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्येही रिलीज झाले आहे. याआधी रिलीज झालेल्या 'हुआ मैं' आणि 'सतरंगा' या दोन्ही गाण्यांनीही लोकांना प्रभावित केले होते. या दोन्ही गाण्यांमध्ये रणबीर आणि रश्मिका मंदान्ना यांची दमदार केमिस्ट्री दिसून आली आहे. रश्मिका मंदान्ना आणि अनिल कपूर यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर हे गाणं रिलीज झाल्याची माहिती दिली. हे गाणे यूट्यूबवर रिलीज करण्यात आले आहे.

अनिल कपूरनेही एनिमलमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली असून बॉबी देओल खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट संदीप रेड्डी वंगा दिग्दर्शित क्राईम ड्रामा आहे. हा बहुप्रतिक्षित चित्रपट १ डिसेंबर २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात पहिल्यांदाच रणबीर कपूर आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दोघांची केमिस्ट्री जोरदार दिसत आहे. यासोबतच हा चित्रपट पाहण्यासाठी चाहतेही खूप उत्सुक आहेत.

Papa Meri Jaan Song
Hrithik Roshan ने गर्लफ्रेंड Saba Azad सोबत सेलिब्रेट केली दिवाळी, फॅमिली फोटो केला शेअर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com