माझ्या आयुष्यातील 'हे' सर्वोत्तम मराठी गाणं : सोनू निगम

माझ्या आयुष्यातील 'हे' सर्वोत्तम मराठी गाणं : सोनू निगम
Published On

सिद्धार्थ चांदेकर आणि मृण्मयी देशपांडे यांच्या ‘मिस यू मिस्टर’ या आगामी चित्रपटाची आतापासूनच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. त्यातच चित्रपटाबद्दल आणखी एक खास बाब समोर आली आहे. या चित्रपटातील एक गाणे हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचा गायक सोनू निगम याने गायले आहे. “मला माहीत आहे असे होणार आहे, फुलांनी मालवलेल्याचा ऋतू येणार आहे. तुला मी पाहतो म्हणून...” हे गाणे सोनूने त्याच्या आयुष्यातील ते सर्वोत्तम गाण्यांपैकी एक असल्याचे म्हटले आहे.

सोनू निगमने गायलेल्या या गाण्याला आलाप देसाई यांनी संगीतबद्ध केले आहे. हे गीत वैभव जोशी यांनी लिहिले आहे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे अत्यंत अर्थपूर्ण अशा शब्दांना तितकेच मधुर आणि हळुवार अशी लय आणि सूर लाभले आहेत. या गाण्यातून चित्रपटात पडद्यावर साकारले गेलेले विविध भाव प्रभावीपणे व्यक्त होतात.

सोनू निगम म्हणाले की, “मी खूप चांगली चांगली गाणी गायली आहेत, पण माझ्या कारकिर्दीतील हे एक सर्वोत्तम गाणे आहे, असे म्हटले तर ती अतिशयोक्ती होणार नाही. आलाप देसाई यांनी एवढे उत्तम गाणे तयार केले आहे की, म्हटले तर ते एक गाणेही आहे आणि एक प्रार्थनाही आहे. ज्याला शब्दही कळत नाहीत, असाही माणूस या गाण्याने मोहीत होईल. मला हे गाणे गाण्याची संधी मिळाली, हे मी माझे भाग्यच मानतो. माझ्या सर्वच गाण्यांमध्ये या गाण्याचे स्थान विशेष असेल,” तो म्हणतो.

‘मिस यू मिस्टर’ 28 जूनला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ‘वाढलेल्या अंतरातून फुलणार प्रेम!’ अशी या चित्रपटाची टॅगलाईन आहे. लाँग डिस्टन्स रिलेशनशिपवर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. 

Web Title: Sonu Nigam says This is the best Marathi song from Miss you mister marathi movie in my life

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com