Shruti Vilas Kadam
बटाट्यांचा ग्लायसेमिक इंडेक्स (GI) जास्त असल्याने ते रक्तातील साखर पटकन वाढवतात, तर रताळ्यांचा GI तुलनेने कमी असल्यामुळे साखर हळूहळू वाढते.
रताळ्यामध्ये फायबर जास्त असतं. फायबरमुळे साखरेचं शोषण मंदावते आणि ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते.
रताळं व्हिटॅमिन A, अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजांनी समृद्ध असतं. बटाट्यांमध्ये पोषणमूल्ये असली तरी रताळ्यांइतकी प्रभावी नसतात.
नियमित जास्त प्रमाणात बटाटे खाल्ल्यास इन्सुलिन स्पाइक्स वाढू शकतात. रताळं मात्र इन्सुलिन सेंसिटिव्हिटी सुधारण्यास मदत करू शकतं.
तळलेले बटाटे किंवा चिप्स रक्तातील साखरेसाठी हानिकारक ठरतात. उकडलेले किंवा वाफवलेले रताळे अधिक सुरक्षित पर्याय आहेत.
रताळं खाल्ल्यानंतर पोट जास्त वेळ भरलेलं राहातं, त्यामुळे ओव्हरईटिंग टळतं आणि साखर नियंत्रणात मदत होते.
मधुमेह किंवा प्रीडायबेटीस असलेल्या लोकांसाठी मर्यादित प्रमाणात रताळं हे बटाट्यांपेक्षा चांगलं मानलं जातं.