Sir Michael Gambon Passed Away Instagram
मनोरंजन बातम्या

Sir Michael Gambon Died: ‘हॅरी पॉटर’मधील ‘मिस्टर डंबलडोअर’ काळाच्या पडद्याआड, गंभीर आजाराने झाले निधन

Sir Michael Gambon Death: मिस्टर डंबलडोअरचे पात्र साकारणाऱ्या एका प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे.

Chetan Bodke

Michael Gambon AKA Dumbledore Passed Away

‘हॅरी पॉटर’ची आजही जगभरात खूपच क्रेझ आहे. या चित्रपटाच्या फॅनलिस्टमध्ये अगदी लहानांपासून ते थोरांमोठ्यांपर्यंत अनेकजण आहेत. अशातच प्रेक्षकांसमोर एक दुःखद बातमी येत आहे. चित्रपटामध्ये मिस्टर डंबलडोअरचे पात्र साकारणाऱ्या एका प्रसिद्ध अभिनेत्याचे निधन झाले आहे.

प्रसिद्ध हॉलिवुड अभिनेते मायकेल गॅम्बॉन यांचं निधन झालं आहे. त्यांनी ‘हॅरी पॉटर’ चित्रपटामध्ये मिस्टर डंबलडोअरचे पात्र साकारले होते. त्यांनी ते पात्र साकारल्या नंतर अवघ्या जगभरात त्यांचा मोठा चाहतावर्ग तयार झाला. मायकेल गॅम्बॉन यांनी हॅरी पॉटरच्या आठ सीरीजपैकी सहा सीरीजमध्ये काम केले होते. मायकेल गॅम्बॉन यांचं वयाच्या ८२ व्या वर्षी निधन झालं आहे. मायकेल गॅम्बॉन यांच्या निधनाचे वृत्त इंडियन एक्सप्रेसने दिले होते. त्यांचे निधन एका गंभीर आजाराने झाल्याचे सांगण्यात येत आहे. सशक्त आणि प्रभावी अभिनयामुळे मायकेल यांची चाहत्यांमध्ये ओळख होती.

मायकेल गॅम्बॉन यांच्या निधनाचे वृत्त ऐकून त्यांच्या जगभरातील चाहत्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मायकेल गॅम्बॉन यांच्या निधनाचे वृत्त पत्नी लेडी गॅम्बॉन आणि मुलगा फर्गस यांनी पब्लिसिटी क्लेअर डॉब्स यांना दिली होती.

पब्लिसिटी क्लेअर डॉब्स यांना दिलेल्या माहितीनुसार, “आम्हाला सर मायकल गॅम्बॉन यांच्या निधनाचे वृत्त सांगताना अत्यंत दुःख होत आहे. ते एक प्रेमळ पती आणि वडील होते. त्यांचे निधन न्यूमोनियामुळे झाला आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र डॉक्टरांच्या अथक प्रयत्नानंतर त्यांची वयाच्या ८२ व्या वर्षी प्राणज्योत मालवली.”

मायकेल गॅम्बॉन यांच्या निधनानंतर हॉलिवूडवर मोठा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या निधनानंतर हॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी पोस्ट शेअर करत त्यांना श्रद्धांजली वाहिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kiwi: किवी खाण्याचे 'हे' आरोग्यदायी फायदे माहितीये का?

Pandharpur to london wari : पंढरीची वारी लंडनच्या दारी; 70 दिवसांत विठुरायाची वारी पोहोचली लंडनला, फोटो पाहून उर भरून येईल

Classy Co-ord Set: ऑफिस किंवा कॉलेजसाठी ट्राय करा 'हे' क्लॉसी को-ऑर्ड सेट्स

Maharashtra Live News Update : पालघर जिल्ह्याला सोमवारी रेड अलर्ट, प्रशासनाकडून सुट्टी जाहीर

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

SCROLL FOR NEXT