Tumbadchi Manjula vs Hai Jawani Toh Ishq Hona Hai and Bandar  saam tv
मनोरंजन बातम्या

'तुंबाडची मंजुळा', 'बंदर', 'है जवानी तो इश्क होना है' मध्ये काटे की टक्कर; मराठी की हिंदी चित्रपट, तिकिट खिडकीवर कोणी मारली बाजी?

Tumbadchi Manjula vs Hai Jawani Toh Ishq Hona Hai and Bandar Box Office Collection : थिएटरमध्ये एकाच दिवशी तीन चित्रपट रिलीज झाले. बॉक्स ऑफिसवर 'तुंबाडची मंजुळा', 'बंदर' की 'है जवानी तो इश्क होना है' कोणी बाजी मारली, जाणून घेऊयात. कलेक्शन वाचा.

Shreya Maskar

५ जूनला 'तुंबाडची मंजुळा', 'बंदर' आणि 'है जवानी तो इश्क होना है' चित्रपट रिलीज झाले.

बॉक्स ऑफिसवर मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये तगडी टक्कर पाहायला मिळत आहे.

सई ताम्हणकर, बॉबी देओल की वरुण धवन बॉक्स ऑफिसवर कोणी बाजी मारली?

एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर तीन चित्रपट रिलीज झाले. सई ताम्हणकरचा मराठी चित्रपट 'तुंबाडची मंजुळा', वरुण धवनचा हिंदी चित्रपट 'है जवानी तो इश्क होना है' आणि बॉबी देओलचा 'बंदर' सिनेमा होय. ही तिन्ही चित्रपट एकमेकांना तगडी टक्कर देत आहेत. हे चित्रपट ५ जूनला रिलीज झाले. अवघ्या ४ दिवसांत कोणी किती कमावले, जाणून घेऊयात. बॉक्स ऑफिसवर मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये स्पर्धा पाहायला मिळत आहे.

'तुंबाडची मंजुळा' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ४

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'तुंबाडची मंजुळा' चित्रपटाचे चौथ्या दिवसाचे कलेक्शन 600 शोमध्ये ₹0.70 लाख रुपये झाले. आतापर्यंत एकूण भारतातील ग्रॉस कलेक्शन ₹4.45 कोटी आणि नेट कलेक्शन ₹3.95 कोटी रुपये झाले आहे.

  • दिवस 1 : 54 लाख रुपये

  • दिवस 2 : 98 लाख रुपये

  • दिवस 3 : 1.73 कोटी रुपये

  • दिवस 4 : 70 लाख रुपये

  • एकूण : 3.95 कोटी रुपये

'है जवानी तो इश्क होना है' बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ४

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'है जवानी तो इश्क होना है' चित्रपटाने चौथ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 3.50 कोटी रुपये कमावले आहेत. यामुळे भारतातील एकूण नेट कमाई २७.५० कोटी रुपयांवर पोहोचली तर भारतातील एकूण ग्रॉस कमाई ३२.९३ कोटी रुपये झाली आहे. परदेशात चित्रपटाने चौथ्या दिवशी १.०० कोटी रुपयांची कमाई केली, ज्यामुळे परदेशातील एकूण ग्रॉस कमाई ९.५० कोटी रुपयांवर पोहोचली आहे. यामुळे जगभरातील एकूण ग्रॉस कमाई ४२.४३ कोटी रुपये झाली आहे.

  • दिवस 1 : 7.50 कोटी रुपये

  • दिवस 2 : 7.50 कोटी रुपये

  • दिवस 3 : 9 कोटी रुपये

  • दिवस ४ : 3.50 कोटी रुपये

  • एकूण: 27.50 कोटी रुपये

'बंदर' बॉक्स बॉक्स ऑफिस कलेक्शन दिवस ४

Sacnilk च्या रिपोर्टनुसार, 'बंदर' चित्रपटाने चौथ्या दिवशी 30 लाख रुपयांची कमाई केली आहे. यामुळे चित्रपटाची भारतातील नेट कमाई 2.75 कोटी रुपये आणि ग्रॉस कलेक्शन 3.30 कोटी रुपये झाले आहे.

  • दिवस 1 : 50 लाख रुपये

  • दिवस 2 : 95 लाख रुपये

  • दिवस 3 : 1.00 कोटी रुपये

  • दिवस 4 : 30 लाख रुपये

  • एकूण : 2.75 कोटी रुपये

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: गोविंद बागेत शरद पवारांकडून ‘शरद मॅंगो’ची लागवड आणि AI तंत्रज्ञानाधारित ऊस पिकाची पाहणी

Bullet Train: मुंबई-पुणे प्रवास फक्त 40 मिनिटांत; पुणे, सोलापूरसह 25 हून अधिक शहरं जोडली जाणार! हायस्पीड रेल्वे प्रकल्पाला वेग

Churchgate Tourism : काळे ढग, रिमझिम पाऊस अन् हिरवीगार मुंबई! वीकेंडला फिरा 'ही' ५ निसर्गरम्य ठिकाणे

३ वर्षे काम केलं, पैसे मिळाले नाहीत! २०० कोटींच्या थकीत बिलांसाठी ठेकेदार आक्रमक

KBC 18: दिवसाला ८०० रुपये कमावणाऱ्या कृष्ण कुमावत यांनी KBCमध्ये जिंकले ५० लाख; १ कोटींच्या प्रश्नावर घेतला 'हा' निर्णय

SCROLL FOR NEXT