Chhatrapati shivaji maharaj: छत्रपती शिवाजी महाराजांची दुर्मिळ चित्रं पाहिलीत का? बघा जगभरातील वस्तूसंग्रहालयात जतन केलेली चित्रं

Surabhi Jayashree Jagdish

Historical Fragments मधील उल्लेख

१७८२ साली प्रकाशित झालेल्या Historical Fragments या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांचे चित्र छापण्यात आलंय. या नोंदीमुळे शिवरायांच्या प्रतिमेचा ऐतिहासिक संदर्भ स्पष्ट होतो. अभ्यासकांच्या मते हे चित्र त्या काळातील महत्त्वाचा दस्तऐवज मानलं जातं.

historical portraits of shivaji maharaj

गोवळकोंडामध्ये काढलेलं चित्र

१६७५ नंतरच्या काळात शिवाजी महाराजांचे चित्र गोवळकोंडामध्ये रेखाटल्याचे संदर्भ मिळतात. या चित्रातून त्या काळातील राजेशाही व्यक्तिमत्त्वाची झलक दिसते.

historical portraits of shivaji maharaj in global museums

बडोदा संग्रहालयातील चित्र

शिवरायांचं एक चित्र सध्या बडोदा संस्थानच्या संग्रहालयात जतन केलंय. हे चित्र १८व्या शतकात काढले गेलं असून राजपूत-मुघल शैलीत असल्याची माहिती आहे.

17th century paintings depicting shivaji maharaj history

रिक्स म्युझियम, हॉलंड

हॉलंडच्या रिक्स म्युझियममध्ये शिवाजी महाराजांचं चित्र आहे. या चित्राची नोंद इसवी सन १६८० मध्ये रेखाटल्याची करण्यात आली आहे.

rare artwork documenting shivaji maharaj visual legacy

फ्रान्सच्या स्मिथ लेसोफ कलेक्शन

फ्रान्सच्या स्मिथ लेसोफ कलेक्शनमध्ये शिवाजी महाराजांचे चित्र आहे. हे चित्र सतराव्या शतकात काढल्याची नोंद आढळते. यामुळे शिवरायांच्या प्रतिमेचं आंतरराष्ट्रीय महत्त्व अधोरेखित होतं.

rare artwork documenting shivaji maharaj

Portraits of Indian Princes मधील चित्र

लंडनच्या Portraits of Indian Princes या चित्रसंग्रहात शिवरायांचं चित्र समाविष्ट आहे. हे चित्र गोवळकोंडामध्ये काढलं गेलं असल्याचं नमूद केलंय. याचा कालखंड १६८० ते १६८७ असा आहे.

shivaji maharaj portraits in european art collections

बर्लिन स्टेट लायब्ररी

जर्मनीतील बर्लिन स्टेट लायब्ररीमध्ये शिवाजी महाराजांचं एक चित्र जतन केलंय. हे चित्र १७व्या शतकात काढलं गेलं असल्याचं सांगितलंय. भारतामधून हॉलंड आणि नंतर जर्मनी येथे ते नेण्यात आल्याची माहिती मिळते.

mughal rajput style painting of shivaji maharaj

जयपूर पोथीखान्यातील चित्र

जयपूरच्या अंबर घराण्याच्या वैयक्तिक दप्तर असलेल्या पोथीखान्यात शिवरायांचे चित्र आढळतं. हे चित्र १८व्या शतकातील असल्याची नोंद करण्यात आली आहे.

historic records mentioning shivaji maharaj portraits

पॅरिस संग्रहालयातील चित्र

पॅरिसच्या संग्रहालयातील चित्र १६७२ मध्ये मीर महमंद यांनी रेखाटलं असल्याची नोंद आहे. पुरंदर तहाच्या वेळी मनुची आणि शिवरायांची भेट झाल्यानंतर मनुची यांच्या सांगण्यावरून हे चित्र तयार झालं.

shivaji maharaj painting references in historical fragments

Chhatrapati Shivaji Maharaj: छत्रपती शिवाजी महाराज दाढी का ठेवायचे? जाणून घ्या कारणं

why did shivaji maharaj keep a beard | saam tv
येथे क्लिक करा