Veen Doghantali Hi Tutena : आई व्हावे की नाही; स्वानंदीने स्पष्टच सांगितले, मालिकेने घेतले धक्कादायक वळण | VIDEO

Veen Doghantali Hi Tutena Serial Update : 'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत आता धक्कादायक वळण पाहायला मिळणार आहे. 'आई व्हावं की नाही' यावर स्वानंदी आपले स्पष्ट मत मांडते. ती नेमकं काय बोलते जाणून घेऊयात.
Veen Doghantali Hi Tutena Serial Update
Veen Doghantali Hi Tutenasaam tv
Published On
Summary

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिकेत अंशुमनचे खोटे सर्वांसमोर येते.

येणाऱ्या भागांमध्ये स्वानंदी आई व्हावं की नाही, यावर आपली भूमिका मांडताना दिसणार आहे.

स्वानंदी अधिराच्या निर्णयाला पाठिंबा देते.

'वीण दोघांतली ही तुटेना' मालिका गेले काही दिवस खूपच रंजक वळणावर पाहायला मिळत आहे. स्वानंदी सर्वांसमोर खुलासा करते की, चिंगी अंशुमनच्या बाळाची आई होणार आहे, त्यामुळे अंशुमनचे लग्न तुटते आणि समर देखील अंशुमनवर प्रचंड भडकतो आणि DNA टेस्ट करणार असल्याचे सांगतो. स्वानंदी ठामपणे चिंगीची बाजू घेताना दिसते. तर आता दुसरीकडे समरच्या बहिणीच्या म्हणजेच अधिराच्या आयुष्यात वादळ येणार आहे.

अधिराची सासू तिला बाळाचे मनावर घेण्यास सांगते, मात्र अधिराला इतक्यात मुलं नको आहे, यामुळे घरात मोठी भांडणे होताना दिसतात. या सर्वात स्वानंदी अधिराची बाजू घेते, त्याच्यासोबत ठामपणे उभी राहते आणि आईला समजवते. स्वानंदी आई व्हावं की नाही?, आई होणे हा कोणाचा निर्णय असावा?, आई कधी व्हावे? या सर्व प्रश्नांवर उत्तर देताना दिसत आहे.

झी मराठी वाहिनीने 'वीण दोघांतली ही तुटेना' या मालिकेचा नवीन प्रोमो शेअर केला आहे. ज्यात अधिराची सासू म्हणजे स्वानंदीची आई अधिराला मुलं करण्यासाठी जबरदस्ती करताना दिसत आहे. त्यावर स्वानंदी अधिराची बाजू घेत आपल्या आईला समजावते. अधिराच्या सासूला स्वानंदी म्हणते की, "मुलं जन्माला कधी घालायचे आणि कोणत्या परिस्थितीत घालायचे, हा ही choice आईलाच असतो. " त्यावर अधिराची सासू स्वानंदीला बोलते की, "मग तुला काय म्हणायचे आहे की, मुलं होऊच द्यायचे नाही..." त्यावर स्वानंदी बोलते की, "अजिबात नाही, असं मी अजिबात म्हटलं नाही आहे. मला इतकच म्हणायचे आहे, मुलं व्हावं की नाही व्हावं हा choice त्या आईचाच असायला हवा..."

'वीण दोघांतली ही तुटेना' च्या नवीन प्रोमोला खूप खास कॅप्शन देण्यात आले आहे. लिहिलं की, "आई व्हावं की नाही, ह्या निर्णयात स्वानंदी ठामपणे अधिराच्या बाजूने!" स्वानंदीचा मिळेला पाठिंबा पाहून अधिराला धीर येतो. या व्हिडीओवर प्रेक्षकांनी भरभरून कमेंट्स केल्या आहेत. स्वानंदीच्या मताला पाठिंबा दिला आहे. तसेच मालिका आता रंजक वळणावर येणार असल्याचे बोले जात आहे. आता अधिरा कोणता निर्णय घेणार, पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 'वीण दोघांतली ही तुटेना' ही मालिका सायंकाळी ७:१५ वाजता झी मराठी वाहिनीवर पाहायला मिळते.

Veen Doghantali Hi Tutena Serial Update
Famous Actress : "७ लाख देतो 'कॉम्प्रोमाइज' कर", प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काउचचा धक्कादायक अनुभव

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com